सकाळी पसार झालेले प्रेमीयुगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:13 AM2021-07-20T04:13:45+5:302021-07-20T04:13:45+5:30

लोकमत न्युज नेटवर्क जामनेर : सकाळी घरातून निघालेले प्रेमीयुगुल सायंकाळी जामनेर पोलीस ठाण्यात लग्नगाठ बांधूनच परतल्याचा प्रकार सोमवारी घडला. ...

Premiyugul passed in the morning | सकाळी पसार झालेले प्रेमीयुगुल

सकाळी पसार झालेले प्रेमीयुगुल

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क

जामनेर : सकाळी घरातून निघालेले प्रेमीयुगुल सायंकाळी जामनेर पोलीस ठाण्यात लग्नगाठ बांधूनच परतल्याचा प्रकार सोमवारी घडला. सुबह के भुले शामको शादी कर लौटे असे म्हणण्याची वेळ आल्याची चर्चा पोलीस ठाण्यात होत होती.

तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण व तरुणी पहाटे घरच्यांना चकवा देत बाहेर पडले. याची घरात माहिती पडताच संशय वाढला. नातेवाईकांनी शोध सुरु केला. अशातच दुपारी ते दोघे लग्न करुनच पोलिसांसमोर हजर झाले. पोलिसांनी दोघांच्या पालकांना बोलावून या शुभमंगल सावधानची माहिती दिली. पण मुलीने आई-वडिलांकडे जाण्यास नकार दिला. मुलीच्या पालकांनी तिला समजाविण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे पालकही हतबल झाले. प्रेमीयुगुल सज्ञान असल्याने पोलिसांचाही नाईलाज झाला. मुलीच्या आई-वडिलांना शेवटी हिरमुसले होऊन परतावे लागले.

Web Title: Premiyugul passed in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.