चाळीसगाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आगमनाची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:17 AM2021-09-26T04:17:38+5:302021-09-26T04:17:38+5:30
पुतळा आगमन नियोजन समिती व शिवनेरी फाउंडेशनतर्फे सर्व तयारी केली जात आहे. शहरात मध्यवर्ती भागातील सिग्नल चौकात छत्रपती शिवाजी ...
पुतळा आगमन नियोजन समिती व शिवनेरी फाउंडेशनतर्फे सर्व तयारी केली जात आहे.
शहरात मध्यवर्ती भागातील सिग्नल चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारला जावा, अशी जनतेची मागणी होती. पुतळा उभारणीसोबतच शिवसृष्टीही येथे साकारली जात आहे.
सिग्नल चौकात पुतळा व्हावा, यासाठी सामाजिक संघटनांसह काही नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली होती.
चौकट
पिलखोड येथून आगमन
सोहळ्याची तुतारी रविवारी सकाळी आठ वाजता पिलखोड येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा सुरू होईल. या संपूर्ण मार्गात अग्रभागी ढोल - ताश्यांचे पथक असणार असून पृष्पवृष्टीही केली जाणार आहे. रांगोळ्यांची आरास साकारण्यात येत आहे. यासाठी शिवनेरी फाउंडेशनची महिला टीम कार्यरत आहे.
चौकट
खासदार उन्मेष पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश
२०१४मध्ये आमदार झाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीसह शिवसृष्टीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक परवानग्या मिळविताना जागेचा प्रश्नही निकाली काढला. सार्वजनिक पाटबंधारे विभागाकडून शिवसृष्टीसाठी जागा मिळवली. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पालिकेकडे रस्ता हस्तांतराची प्रक्रियाही पूर्णत्वास नेली. यामुळेच पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला. खा. पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
समस्त चाळीसगाववासीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. गेल्या चार दशकांपासूनची प्रतीक्षा आता संपली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आगमनाने उत्साह संचारला आहे. लवकरच लोकार्पणही केले जाईल.
-मंगेश रमेश चव्हाण,
आमदार, चाळीसगाव.
पाॕईंटर
असा आहे शिवरायांचा पुतळा
ब्राॕझ धातूपासून पुतळा तयार करण्यात आला आहे.
२१ फुट उंचीचा हा पुतळा पाच टन वजनाचा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला.
नाशिक येथील शिल्पकार श्रेयस गर्गे यांनी हा पुतळा साकारला आहे.
पुतळा पूर्णाकृती असून अश्वारुढ आहे. पुतळ्याच्या चबुतऱ्याशेजारी शिवसृष्टीही साकारली जात आहे.
पॉईंटर
सिग्नल चौकात ६८० चौ. मी. जागेत शिवसृष्टीही उभारली जात आहे. शिवसृष्टीसाठी ६० लाख ३४ हजाराचा निधी मिळाला आहे. पुतळा तयार करण्यासाठी ५८ लाख ५० हजार रुपये खर्च आला आहे.
चबुतरा व संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी ७२ लाखांचा निधी मिळाला आहे.