जळगावात स्पर्धा परीक्षेची तयारी करणा:या विद्याथ्र्याची आत्महत्या
By admin | Published: April 25, 2017 06:10 PM2017-04-25T18:10:05+5:302017-04-25T18:10:05+5:30
स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या शुभम महाजन (वय 23, रा.चाळीसगाव) या विद्याथ्र्याने जळगावातील दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या गच्चीवर अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेतले,
जळगाव,दि.25- स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या चाळीसगाव येथील शुभम ज्ञानेश्वर महाजन (वय 23, रा.चाळीसगाव) या विद्याथ्र्याने जळगावातील शाहू नगरातील दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या गच्चीवर अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेतले, त्यानंतर इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रय} केला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शुभम याचे बी.टेक र्पयत शिक्षण झाले असून त्याचे वडील चाळीसगाव तालुक्यात शिक्षक आहेत. गेल्या काही वर्षापासून तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहे. आज तो दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्रात आला व त्याने आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.