काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानिमित्त तयारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:00+5:302021-06-22T04:13:00+5:30
नाना पटोले यांचे संध्याकाळी सात वाजता धरणगावमार्गे अमळनेरात आगमन होणार आहे. कार्यक्रम गलवाडे रोडवरील अंबिका मंगल कार्यालयात होणार ...
नाना पटोले यांचे संध्याकाळी सात वाजता धरणगावमार्गे अमळनेरात आगमन होणार आहे. कार्यक्रम गलवाडे रोडवरील अंबिका मंगल कार्यालयात होणार आहे. पटोले यांच्यासोबत जिल्हा दौऱ्यावर प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील हे उपस्थित राहतील.
यात तालुक्यातील काँग्रेस पक्ष कार्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यात काँग्रेस पक्ष संघटनाबांधणीची तालुकानिहाय परिस्थिती, पक्ष संघटना बांधणीसंबंधीच्या अडचणी, तालुकाध्यक्षांमार्फत जाणून घेतल्या जातील. अडचणीसंदर्भात मार्गदर्शनदेखील होणार आहे. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन, शासनदरबारी त्यावर काय करता येईल, याचादेखील विचार होणार आहे. त्यासाठी किसान काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांचीदेखील बैठक बोलावण्यात येणार आहे. असे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा काँग्रेसचे अजबराव पाटील कळवितात.