देशपातळीवर खेळण्यासाठी चाळीसगावचा कबड्डी संघ तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 03:34 PM2019-01-04T15:34:06+5:302019-01-04T15:35:38+5:30
कला क्षेत्रात चाळीसगावचे नाव सातासमुद्रापार पोहचले आहे. मात्र क्रीडा क्षेत्रातही होतकरू खेळाडूंना संधी देऊन देशपातळीवर खेळू शकले, असा कबड्डीचा संघ तयार करण्यात येईल, अशी घोषणा भारतीय कृषी व अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे सदस्य व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव कैलास सूर्यवंशी यांनी शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्र परिषदेत केली.
चाळीसगाव, जि.जळगाव : कला क्षेत्रात चाळीसगावचे नाव सातासमुद्रापार पोहचले आहे. मात्र क्रीडा क्षेत्रातही होतकरू खेळाडूंना संधी देऊन देशपातळीवर खेळू शकले, असा कबड्डीचा संघ तयार करण्यात येईल, अशी घोषणा भारतीय कृषी व अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे सदस्य व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव कैलास सूर्यवंशी यांनी शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्र परिषदेत केली.
रविवारी सकळी नऊ वाजता चाळीसगाव प्रिमिअर लीग अंतर्गत घेण्यात येत असलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते होत असल्याची माहितीही सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.
कैलास सूर्यवंशी मित्र मंडळातर्फे चाळीसगाव प्रिमिअर लीग अंतर्गत १७ वर्ष आतील व १७ वर्षापुुढील खुल्या अशा दोन गटात कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्र्धेसाठी तालुक्यातील १९२ कबड्डी संघांनी सहभाग घेतला आहे. विजेत्यांना संघांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
तालुका स्तरावर पहिल्यांदाच अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सहभागी १९०० खेळाडूंमधून ६० खेळाडू निवडले जातील. निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवरील कोच कडून प्रशिक्षण दिले जाईल. या खेळाडूंचे पालकत्व आपण स्वीकारणार असून ६० खेळाडूंमधून पुन्हा देशपातळीवर खेळू शकतील, असे २० खेळाडू निवडले जातील.
शुभारंभ स्पर्र्धेसाठी खासदार ए.टी.पाटील, माजी मंत्री एम.के.पाटील, माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे, आर.ओ.पाटील, राजीव देशमुख, चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रांताधिकारी शरद पवार आदी उपस्थित राहणार आहेत.
पत्रपरिषदेला नगरसेवक सुरेश स्वार, जि.प.चे माजी सदस्य शेषराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र वाडीलाल राठोड, चाळीसगाव खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष किसनराव जोर्वेकर उपस्थित होते.