भुसावळात बारावीच्या पियुष पगारेने केली कायदेविषयक वेबसाईट तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 07:36 PM2018-01-06T19:36:17+5:302018-01-06T19:39:24+5:30
दे.ना.महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी पियुष जयेंद्र पगारे याने जनसामान्यांना कायदेविषयक माहिती मिळावी शिवाय कायद्याचा अभ्यास करण्यासाठी (डब्लू.डब्लू.इंडियनलॉवेबडॉटकॉम) या नावाची वेबसाईड तयार केली आहे.
आॅनलाईन लोकमत
भुसावळ, दि.६ : शहरातील दे.ना.महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी पियुष जयेंद्र पगारे याने जनसामान्यांना कायदेविषयक माहिती मिळावी शिवाय कायद्याचा अभ्यास करण्यासाठी (डब्लू.डब्लू.इंडियनलॉवेबडॉटकॉम) या नावाची वेबसाईड तयार केली आहे.
स्पर्धात्मक परिक्षेत बºयाच वेळा कायदे जाणून घेण्यासाठी व कोणत्या कलमानुसार कोणता गुन्हा दाखल होतो. याची माहिती नसल्याने अभ्यास करताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात. स्वता:चे अनुभव लक्षात घेऊन आपल्याला असलेली कायद्याची माहिती व तंत्रज्ञान आणि आजच्या आधुनिक युगात एका क्लिकवर सर्व कायद्याच्या कलमांची सविस्तर माहिती मिळावी याकरीता भुसावळ येथील बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी पियुष याने इंडियन लॉ वेब डॉटकॉम अशी वेबसाईट तयार केली. यासाठी त्याला चार दिवसांचा कालावधी लागला वेबसाईटवर सर्व कलमांची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी त्याला दोन हजार सातशे रुपये इतका खर्च आला आहे.
पियुषचे वडील जयेंद्र पगारे भुसावळात बाजारपेठ पोलीस ठाण्यात हवालदार पदावर आहेत. भविष्यात स्वतंत्र कंपनी स्थापन करुन अशाच पद्धतीने विविध विषयावर माहिती संकलीत करण्याचा त्याचा मानस आहे. पुस्तक वाचून व इंटरनेटवरील माहिती संकलीत करून वेबसाईट तयार केली असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले.