नगाव खुर्दच्या सरपंच प्रेरणा सुशिलकुमार बोरसे ठरल्या ‘लोकमत सरपंच आॅफ दि इयर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 16:00 IST2019-02-23T15:59:18+5:302019-02-23T16:00:46+5:30
जळगाव : अभिनेता अमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन आयोजित स्पर्धेत सहभागी होणारे अमळनेर तालुक्यातील नगाव खुर्द हे पहिले गाव़ ...

नगाव खुर्दच्या सरपंच प्रेरणा सुशिलकुमार बोरसे ठरल्या ‘लोकमत सरपंच आॅफ दि इयर’
जळगाव : अभिनेता अमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन आयोजित स्पर्धेत सहभागी होणारे अमळनेर तालुक्यातील नगाव खुर्द हे पहिले गाव़ गावाची एकजून पाहून भारतीय जैन संघटनेने मोफत जेसीबी आणि पोकलॅन पुरविले़ त्यामुळे गावात पाणी आले आणि त्याला श्रमदानाची जोड मिळाली़ स्वत: बीए़बी़एड झालेल्या सरपंच प्रेरणा बोरसे यांच्या प्रेरणेतून गावाचा वॉटर बजेट तयार करण्यात आला़ त्याचे सर्वेक्षण आणि पाहणी करण्यात आली़ त्यामुळे वाहून जाणारे पाणी गावातच थांबविण्यात आले़ तालुका वॉटरकप स्पर्धेत नगाव खुर्दला बक्षीस मिळाले़ वॉटर बजेट करणारे जिल्ह्यातले हे एकमेव गाव आहे़