जळगाव जिल्हा पोलीस दलातील हजेरी मास्तर ठरताहेत वरचढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:30 PM2019-12-03T12:30:24+5:302019-12-03T12:31:05+5:30
प्रभारींकडूनही झुकते माप
जळगाव : पोलीस दलात ‘हजेरी मास्तर’ या पदाचा अलीकडे चांगलाच रुबाब वाढत चाललाय. पोलीस ठाण्यांमध्ये प्रभारी अधिकाऱ्यानंतर याच हजेरी मास्तरची चलती व दरारा असतो. त्यामुळे या पदात नेमके दडलयं काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही. हे पद नेमके कोणाकडे असावे असेही सूत्र निश्चित नाही.
जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे व कार्यकारी शाखेत हे पद निर्माण करण्यात आले आहे. हजेरी मास्तरने प्रभारी अधिकाऱ्यांच्या परवानगीने दुय्यम पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना चक्राकार पध्दतीने व समान न्याय तत्वावर ड्युटी लावणे अपेक्षित आहे.
मात्र अलीकडच्या काळात हजेरी मास्तरकडून सोयीस्करपणे ड्युट्या लावल्या जात असून त्यांच्या माध्यमातून रस्त्यातील काटेही दूर केले जात आहेत.
मग काही ठिकाणी हजेरी मास्तर स्वत: निर्णय घेतात तर काही ठिकाणी प्रभारी अधिकारी हजेरी मास्तरला पुढे करुन हे काम करतात.
घरगडीची जागा घेतली हजेरी मास्तरने
काही मोजक्या पोलीस ठाण्यात व शाखांमध्ये हजेरी मास्तरने घरगडीची जागा घेतल्याचे दिसून येत आहे. प्रभारी अधिकाºयाच्या घरचे काम करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी कार्यरत असतो. तो आर्थिक व्यवहारही सांभाळतो. मात्र आता काही ठिकाणी अवैध धंदे बंद असल्याने हे काम हजेरी मास्तरच करु लागला आहे. दरम्यान, काही हजेरी मास्तर कर्मचाºयांकडून पैशांचीही मागणी करीत असल्याची ओरड होत आहे.
नवचैतन्य कोर्स व रात्रपाळी नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पोलीस कर्मचाºयाने वर्षातून एकदा पंधरा दिवसाचा नवचैतन्य कोर्स करणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश हजेरी मास्तर या कोर्सला गेलेलेच नाही. त्याशिवाय रात्रपाळीची ड्युटीही त्यांनी कधी केलेली नाही. तपास कामात त्यांचा कधीच सहभाग नसतो, किंवा एखाद्या गुन्ह्याचा तपासही ते स्वत:हून घेत नाही किंवा प्रभारी अधिकारीही त्यांच्याकडे तपास सोपवत नाहीत. मोजकेच कर्मचारी वर्षानुवर्ष हजेरी मास्तरची ड्युटी करीत आहेत. पोलीस शिपाई ते सहायक फौजदार या पदापर्यंतचे कर्मचारी हजेरी मास्तरची ड्युटी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे हजेरी मास्तर आता वरचढ ठरु लागले आहेत.
अश्लिल वर्तन आणि आत्महत्येचा प्रयत्न
हजेरी मास्तरला कंटाळून काही कर्मचाºयांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. गेल्या वर्षी तर एका महिला कर्मचाºयाने पोलीस ठाण्यातच अतिरिक्त गोळ्या सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तेव्हा या महिलेने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीही लिहिली होती. दोन पोलीस ठाण्यांमध्ये तर दोघांनी महिला कर्मचाºयांशी अश्लिल वर्तन केल्याचा प्रकार घडला. मात्र दुर्देव म्हणा कि हजेरी मास्तरचे वजन यामुळे वरिष्ठांकडे तक्रारी होऊनही हजेरी मास्तरवर कारवाई झाली नाही. उलट तोºयात ते ड्युटी करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाºयाकडे प्रभारींकडून बचाव
काही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोजक्याच कर्मचाºयांना रात्रपाळी, सतत बाहेरगावची व अडचणीची ड्युटी लावली जाते, तर आर्थिक व्यवहार व हुजरेगिरी करणाºया कर्मचाºयांना सोयीप्रमाणे ड्युटी लावण्याचे काम अनेक हजेरी मास्तरकडून केले जाते. पोलीस ठाण्यांमधील सर्व राजकारण याच पदाभोवती फिरते. त्यांच्याकडून प्रभारी अधिकाºयांचे कान भरले जातात. हजेरी मास्तरांच्या काही तक्रारी झाल्या तरी प्रभारी अधिकारी वरिष्ठांकडे त्यांना सांभाळून घेतात. येथेही दुर्देवाने प्रभारी अधिकाºयांच्याच सांगण्यावर वरिष्ठ विश्वास ठेवतात, म्हणून खदखद व गटबाजी अधिक वाढते.