598 संस्थांचा निवडणूक खर्च महिनाभरात सादर करा
By admin | Published: April 8, 2017 01:26 PM2017-04-08T13:26:52+5:302017-04-08T13:26:52+5:30
हा खर्च कोणत्याही परिस्थितीत येत्या महिनाभरात सादर करावा अशी तंबी तालुका उपनिबंधक व निवडणूक अधिका:यांना दिली.
राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांची तंबी : उपनिबंधकांसह निवडणूक अधिका:यांसोबत बैठक
जळगाव : अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका आटोपल्या मात्र बराच कालावधी लोटला तरी निवडणूक खर्चाचा तपशिल सादर न केल्याने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत येत्या महिनाभरात सादर करावा अशी तंबी तालुका उपनिबंधक व निवडणूक अधिका:यांना दिली.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. झालेल्या निवडणुकांच्या काळातील खर्चाच्या तपशिलांचा आढावा घेण्यासाठी मधुकर चौधरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आले होते. यावेळी सर्वच तालुक्यांच्या सहनिबंधक व निवडणुकांशी संबंधित अधिका:यांना बोलविण्यात आले होते. प्रारंभी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांचा आढावा सादर केला.
1639 संस्थांच्या निवडणुका
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 1339 सहकारी संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत. पैकी 994 सहकारी संस्थांसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिका:यांनी निवडणुकीत झालेल्या खर्चाचा हिशोब सादर केला आहे. तर 598 सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊन बराच कालावधी लोटला तरी निवडणूक निर्णय अधिका:यांनी झालेल्या खर्चाचा हिशोब अद्याप सादर केलेला नाही.
अधिका:यांना तंबी
हिशोब सादर न करण्यात येणा:या अडचणींची माहितीही मधुकर चौधरी यांनी यावेळी घेऊन मार्गदर्शन केले.
यानंतर आता येत्या महिनाभरात हिशोब जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केला जावा असे आदेश यावेळी देण्यात आले. हिशोब सादर न करणा:या संस्था ब, क व ड वर्गवारीतील आहेत. यात जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, रावेर व यावल या तालुक्यांमधील संस्थांचा समावेश आहे.
जळगावचे पत्र राज्यभरात
हिशोब सादर करण्यात राज्यात जळगाव जिल्ह्याची चांगली प्रगती आहे. हिशोब सादर करावेत म्हणून जिल्हा उपनिबंधक जाधवर यांनी तालुक्यांना पत्र दिले होते. हिशोब सादर न केल्यास गुन्हे दाखल केले जातील अशा इशा:यांचे हे पत्र होते. त्याचे परिणाम चांगले दिसून आल्याने, हे पत्र आता राज्यातील विविध जिल्ह्यांना दाखविले जाईल असे चौधरी यांनी सांगितले.