सुर्योदय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. चंदनशिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:15 AM2021-02-15T04:15:02+5:302021-02-15T04:15:02+5:30

जळगाव : सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या १९ व्या वर्धापनदिनानिमीत्त जळगावात होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या ...

As the president of Suryoday Sahitya Sammelan, Pvt. Chandanashiv | सुर्योदय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. चंदनशिव

सुर्योदय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. चंदनशिव

Next

जळगाव : सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या १९ व्या वर्धापनदिनानिमीत्त जळगावात होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात लेखक प्रा. भास्कर चंदनशिव (कळंब,जि उस्मानाबाद) यांची निवड करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली.

प्रा. भास्कर चंदनशिव यांचे साहित्य महाराष्ट्रातील ज विद्यापीठांत अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्यांच्या नावावर १४ ग्रंथ संपदा प्रकाशित आहे. त्यांना ३ राज्यशासनाचे पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचा पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. दरम्यान, येत्या मार्चमध्ये अशोक कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली सतरावे संमेलन होणार आहे. तसेच प्रा डॉ. किशोर सानप यांच्या अध्यक्षतेखाली पद्मश्री डॉ. भवरलाल जैन एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन तर प्रा दीपमाला कुबडे प्रायोजित प्रा. डॉ. सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले असल्याचे सतीश जैन यांनी सांगितले.

Web Title: As the president of Suryoday Sahitya Sammelan, Pvt. Chandanashiv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.