शिरसोलीत इच्छापूर्ती हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:16 AM2021-07-26T04:16:10+5:302021-07-26T04:16:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हनुमान हे शक्ती प्रदान करणारे शक्तीपीठ असून तरुणांनी बलोपासना करून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : हनुमान हे शक्ती प्रदान करणारे शक्तीपीठ असून तरुणांनी बलोपासना करून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते व मदतीने तालुक्यातील शिरसोली येथे रविवारी श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या इच्छापूर्ती हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात गुलाबराव पाटील बोलत होते.
तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील श्रीकृष्ण मंदिराने उभारलेल्या इच्छापूर्ती हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक दात्यांनी मदत केली होती. यातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती माजी सभापती नंदलाल पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, सरपंच प्रदीप पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रमेश पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, रामकृष्ण काटोले, शेख रहीम भाई, मुरलीधर ढेंगळे, शेनफडू पाटील, श्रावण ताडे, श्रीकृष्ण मित्रमंडळाचे अध्यक्ष रघुनाथ मराठे, उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, माधव साबळे, देवेंद्र सोनवणे, विनोद मराठे व निंबा पाटील, उमाजी पानगळे, दयाराम धामणे, रघुनाथ मराठे, देवचंद खैरे, देवीदास साबळे आदी उपस्थित होते. शिरसोली प्र. न. गावासाठी तब्बल दोन कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला जल मिशन योजनेत समावेश केला असून तत्काळ अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. तसेच गावाच्या ग्राम सचिवालयासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.