तृतीयपंथीय असल्याची बतावणी करून पैसे उकळणा-यांना जळगावात बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:12 PM2017-12-29T12:12:05+5:302017-12-29T12:13:19+5:30

जळगावातील गोलाणी मार्केटमधील प्रकार

Pretending to be a tutor, the moneylenders turned up in Jalgaon | तृतीयपंथीय असल्याची बतावणी करून पैसे उकळणा-यांना जळगावात बदडले

तृतीयपंथीय असल्याची बतावणी करून पैसे उकळणा-यांना जळगावात बदडले

Next
ठळक मुद्देतृतीयपंथीयांनी दिला चोपकपडे काढून अर्धातासार्पयत धुलाई

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29- साडी, ब्लाऊज परिधान करुन गोलाणी मार्केटमध्ये तृतीयपंथी असल्याची बनवेगिरी करीत पैसे उकळणा:या  दोन मद्यपींना येथील तृतीयपंथीयांनी बेदम चोप दिल्याची घटना गुरुवारी सकाळी 10़30  वाजेच्या सुमारास घडली़ अर्धा तासार्पयत गोंधळ सुरु असताना शहर पोलीस स्टेशनला प्रकार कळवूनही पोलीस न आल्याचा आरोप करण्यात आला. 
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी, गोलाणी मार्केटमध्ये सकाळी 10 वाजेच्या सुमारास साडी, ब्लाऊज घातलेले व खांद्याला पिशवी लटकविलेले दोन जण दुकानदारांकडून पैसे वसूल करीत होत़े दारुच्या नशेत दोन जणांनी आठ ते दहा दुकानदारांकडून पैसे वसूलही केल़े एका दुकानदाराला संशय आल्याने त्याने त्याबाबत गोलाणी मार्केटमधील रहिवासी तृतीयपंथी जगन मामा यांना भ्रमणध्वनीवरुन हा प्रकार कळविला़ पैसे वसूल करणा:यांवर कुठलीही कारवाई केली जात नाही, ते दिवसा वसुली व रात्री चो:याही करत असल्याचे ते म्हणाल़े  या प्रकारांमुळे तृतीयपंथीयांची बदनामी होते. नागरिकांनी कुठल्याही कार्यक्रमाला बोलविताना तृतीयपंथी कोण व कुठले आहेत, याची खात्री करावी, असे आवाहन त्यांनी केले आह़े

कपडे काढून अर्धातासार्पयत धुलाई
गोलाणी मार्केटमधील तृतीयपंथी राशी, अर्चना, काजल जान, सानिया हे घटनास्थळी  पोहचले व दोघा मद्यपींना चोप द्यायला सुरुवात केली़ यानंतर तृतीय पंथीयांनी त्यांचे कपडे काढले व त्यांना पुन्हा मारहाण केली़ दोघांची बनवेगिरी उघड झाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला तृतीयपंथीयांनी कळविले. मात्र अर्धातासार्पयत पोलीस आले नाही. त्यानंतर गर्दीतून वाट काढून दोघे पसार झाले, असे जगनमामा यांनी  सांगितल़े गोलाणी मार्केटमधील दुकानदारांसह बघ्यांची एकच गर्दी जमली होती़ सुमारे अर्धा तासार्पयत हा गोंधळ सुरु होता़

Web Title: Pretending to be a tutor, the moneylenders turned up in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.