प्रदूषण रोखा, अन्यथा महापौर, आयुक्तांवर गुन्हे दाखल करू - रामदास कदम
By admin | Published: July 13, 2017 01:22 PM2017-07-13T13:22:49+5:302017-07-13T13:22:49+5:30
रामदास कदम सुद्धा बुधवारी शहरात आले होते
Next
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 13 - महापालिकेचा पाणी पुनर्वापर प्रकल्प आहे का? नसेल तर महापौर, आयुक्तांवर गुन्हे दाखल करू असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम हे महापौर नितीन लढ्ढा व प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना दिला. नंतर मात्र याप्रश्नी मदतीची तयारी दर्शवून महापालिकेने प्रस्ताव सादर करावा आपण सहकार्य करू अशी भूमिकाही त्यांनी यावेळी घेतली. शेतक:यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे हे जिल्हा दौ:यावर आले होते. त्यानिमित्त रामदास कदम सुद्धा बुधवारी शहरात आले होते. शासकीय विश्रामृहात महापौर नितीन लढ्ढा व जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हा इशारादिला.गिरणा नदीत प्रदूषणमहापौर लढ्ढा यांनी स्वागत केल्यानंतर चर्चेदरम्यान नदी प्रदूषणाचा विषय निघाला. गिरणा नदीत शहरातील काही भागातील सांडपाणी सोडले जाते. हा प्रकार गंभीर असल्याचे रामदास कदम म्हणाले. पर्यावरण विषयक चर्चेदरम्यान कदम यांनी महापालिकेच्या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पा विषयी विचारणा केली.भुयारी गटार प्रकल्पात समावेशकदम यांनी विचारणा केल्यानंतर लढ्ढा यांनी मनपाचा तसा प्रकल्प नसल्याचे सांगितले मात्र अमृत योजनेंतर्गत भुयारी गटार योजनेच्या 138 कोटींच्या पहिल्या टप्प्याला राज्यस्तरीय समितीची मंजुरी मिळाली असून या प्रकल्पातच सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचाही समावेश