वाळूचोरी रोखण्यासाठी गिरणा व अंजनी पात्रातील चोर रस्ते केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:40+5:302021-05-28T04:13:40+5:30

नांदेड, ता. धरणगाव : रात्री-अपरात्री होणारी चोरटी अवैध वाळू वाहूतक रोखण्यासाठी गिरणा व अंजनी नदीपात्रातील व पात्रालगतचे सर्व चोर ...

To prevent sand theft, the thieves in the mill and Anjani Patra closed the roads | वाळूचोरी रोखण्यासाठी गिरणा व अंजनी पात्रातील चोर रस्ते केले बंद

वाळूचोरी रोखण्यासाठी गिरणा व अंजनी पात्रातील चोर रस्ते केले बंद

Next

नांदेड, ता. धरणगाव : रात्री-अपरात्री होणारी चोरटी अवैध वाळू वाहूतक रोखण्यासाठी गिरणा व अंजनी नदीपात्रातील व पात्रालगतचे सर्व चोर रस्ते मंडल अधिकारी गणेश बिऱ्हाडे यांनी बंद केल्यामुळे अवैध चोरट्या वाळू वाहतुकीस आळा बसणार आहे.

नारणे, बाभूळगाव व पळसोदलगतच्या गिरणा व अंजनी नदीपात्रांमधून रात्री-अपरात्री ट्रॅक्टरांद्वारे मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैध चोरटी वाहतूक केली जात होती. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गणेश बिऱ्हाडे, नारणे तलाठी रोशनी मोरे, बाभुळगाव तलाठी आरिफ शेख, सरपंच व पोलीस पाटील बाभूळगाव यांनी पोकलॅन मशीनच्या सहाय्याने गिरणा व अंजनी नदीपात्रालगतच्या सर्व चोर रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी मोठमोठाले लांबलचक व खोल चर खोदून सर्व चोररस्ते बंद केल्यामुळे अवैध चोरट्या वाळू वाहतुकीस आळा बसणार आहे.

तसेच रात्रीच्यावेळी होणाऱ्या चोरट्या वाळू वाहतुकीस आळा घालण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत गस्तीपथक तयार करण्यात आले आहे.

===Photopath===

270521\27jal_8_27052021_12.jpg

===Caption===

पोकलॅण्ड मशिनच्या मदतीने गिरणा व अंजनीपात्रातील चोररस्ते बंद करताना मंडळ अधिकारी गणेश बिऱ्हाडे, तलाठी वर्ग, सरपंच व पोलीस पाटील.

Web Title: To prevent sand theft, the thieves in the mill and Anjani Patra closed the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.