भुसावळ तालुक्यात कापूस बियाण्यांची विक्री रोखली

By admin | Published: May 14, 2017 11:56 AM2017-05-14T11:56:43+5:302017-05-14T11:56:43+5:30

कापूस बियाण्यांची 443 पाकिटांची विक्री भुसावळ तालुक्यात कृषी विभागाने थांबवली आह़े

Preventing the sale of cotton seeds in Bhusawal taluka | भुसावळ तालुक्यात कापूस बियाण्यांची विक्री रोखली

भुसावळ तालुक्यात कापूस बियाण्यांची विक्री रोखली

Next

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव,  दि. 13 - राज्याच्या बियाणे गुणनियंत्रण आयुक्तालय संचालकांच्या आदेशानुसार राशी 659  बीजी- 2 या कापूस बियाण्यांची 443 पाकिटांची विक्री भुसावळ तालुक्यात कृषी विभागाने थांबवली आह़े
 तालुक्यातील शेतकी संघासह शहरातील विविध बी-बियाणे दुकानांमध्ये तपासणीदरम्यान ही पाकिटे आढळून आली.  त्यांची विक्री तत्काळ थांबविण्यात आली आह़े पंचायत समितीच्या कृषी विभागाचे विस्तार अधिकारी पी़एल़धांडे व सहका:यांनी ही कारवाई केली़
दरम्यान, राज्या-परराज्यातून येणारे बोगस बियाण्यांवर कारवाई करण्यासाठी तालुका कृषी विभागातर्फे भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आह़े  मराठवाडय़ात  राशी 659  बीजी-2 या कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने राज्याच्या बी-बियाणे गुण नियंत्रण कृषी आयुक्तालय संचालकांनी  या कापसाच्या वाणाची तातडीने विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत़

Web Title: Preventing the sale of cotton seeds in Bhusawal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.