पूर्वीचा दोनपदरी रस्ताच बरा होता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:50 PM2019-11-20T12:50:58+5:302019-11-20T12:51:07+5:30
डॉ़ हेमंत पाटील : जळगाव -औरंगाबाद रस्त्यावर त्रास झाला दुप्पट: जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
जळगाव : जळगाव -औरंगाबाद महामार्गाच्या दुरावस्थेमुळे हजारो वाहनधारक त्रस्त असून काम रखडल्याने आता चौपदरीकरणापेक्षा पुर्वीचा दोनपदरी रस्ता सुस्थितीत बरा होता, अशी खंत मांडत या रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी डॉ़ हेमंत पाटील यांनी केली आहे़ त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे व औरंगाबादचे महामार्ग सर्कलचे कार्यकारी अभियंता पी़एस़ औटी यांना निवेदन दिले आहे़
जळगाव-औॅरंगाबाद महामार्ग सध्या वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे़ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनधारकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर सुरू केला आहे़ रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था असून सर्वदूर याबाबत आवाज उठविला जात आहे़ आधीच तीन तेरा वाजलेल्या या रस्त्यावर काही नियोजनाचा अभाव असलेली कामे होत असल्याने त्रास दुप्पट वाढला आहे़ याबाबत डॉ़ हेमंत पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे़ त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, डांबरी रस्त्याची डागडूजी न केल्यामुळे तसेच यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले़ नवीन रस्त्याचे काम एक वर्षापासून ठप्प आहे, तरी दोन महिन्यापूर्वी क्रॉसिंग करणाऱ्या ओव्हरहेड वायर अंडरग्राऊंड करण्यासाठी रस्त्यावर जेसीबीने आडवे चर मारून त्यात पाईप टाकण्यात आलेले आहेत़ १४ किमीत २७ ठिकाणी खोदकाम केलेले आहे़ रस्ता आडवा खोदला गेल्याने एक ते दीड फुटाचे खड्डे झालेले आहेत़ अजुनही वायर्स वरच असल्याने महावितरणशी समन्वय नसल्याचे स्पष्ट होते, त्यामुळे केवळ कुणातरी ठेकेदाराचे बील काढण्यासाठी सर्व वाहनधारकांना त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचे डॉ़ पाटील यांनी म्हटले आहे, किमान यापुढे काम होत नसल्यास रस्ते खोदू नये, असेही त्यांनी म्हटले आहे व खड्डे बुजून डांबरीकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे़ प्रशासनाने दुरूस्ती करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
चिंचोली पुलाच्या बाजुचा भराव वाहिला
चिंचोली जवळच्या उंच पुलाच्या एका बाजुला भराव वाहून गेल्यामुळे, खचल्यामुळे हा पुल कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे़ वळणावरच मोठा खड्डा तयार झाला आहे रस्त्याच्या विरूद्ध बाजुला झाडाच्या फांद्या अडचणीच्या ठरत आहेत़ त्यामुळे याबाबत तत्काळ उपाययोजना करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे़ अन्यथा लोक अनिच्छेने पर्यायी रस्ते वर्षानुवर्षे वापरतील, असे डॉ़ हेमंत पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे़
महामार्गाचे काम आता तीन कंत्राटदारांना
औॅरंगाबाद महामार्गाचे काम आता तीन कंत्राटरांना देण्यात आले असून कामाला गती येऊन वाहनधारकांची कसरत थांबणार आहे़ केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भात माहिती दिली होती़ दरम्यान, आऱ के़ चव्हण, आऱ एस़ कामटे आणि स्पायरा इन्फ्रा या तीन कंत्रांटदारांना हे काम देण्यात आले आहे़ आधीच्या कंत्राटदाराने पळ काढल्याने काम रखडलेले होते़ आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याबाबत दखल घेतली होती़
नशिराबाद, कुºहे पानाचेमार्गे जामनेर रस्त्याचा वापर वाढला
औरंगाबाद रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने जामनेरकडे जाणाºया व तिकडून येणाºया वाहनधारकांकडून नशिराबाद, कुºहे पानाचे या मार्गाचा वापर केला जात आहे. जळगाव-औरंगाबाद राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. मक्तेदाराने सर्व रस्ताच खोदून ठेवत काँक्रीटीकरण रखडवल्याने जळगाव-औरंगाबादचा थेट संपर्क तुटल्यात जमा झाला होता. त्यात जळगावहून जामनेरला जाण्यासाठी नेरीमार्गे जावे लागत असले तरी या महामार्गावर जळगाव जिल्ह्यातीलच रस्त्याची अधिक बिकट स्थिती असल्याने जामनेरलाही जाणे कसरतीचे ठरत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव वाहनधारकांना नशिराबादमार्गाचा वापर करावा लागत आहे. जळगावहून औरंगाबाद जाण्यासाठी चाळीसगाव अथवा पारोळामार्गाचा वाहनधारक वापर करीत आहे. त्याप्रमाणे वाहनधारकांनी जामनेरसाठीही पर्यायी मार्ग निवडला आहे. जळगावहून नशिराबाद, सुनसगाव, कुºहे पानाचे व तेथून जामनेर अशा मार्गाने सध्या वर्दळ वाढली आहे. जळगावहून नशिराबादपर्यंत मोठा रस्ता असला तरी त्यापुढे एकेरी रस्ता असल्याने तेथे अडचणी आल्यातरी वाहनधारक हा मार्ग पसंत करीत आहेत. त्यानंतर पुढे पुन्हा कुºहे पानाचे ते जामनेर हा रस्ताही खराब असला तरी किमान नेरीमार्गापेक्षा तो बरा असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.