पारोळा कृउबात शेतमालास नवीन लिलाव पद्धतीने मिळतोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:50 PM2018-02-04T23:50:05+5:302018-02-04T23:52:41+5:30
पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन पद्धतीच्या लिलाव प्रक्रीयेमुळे शेतमालास चांगला भाव मिळत असल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.
Next
ठळक मुद्दे१ फेब्रुवारीपासून नवीन पद्धतीचा अवलंबशेतकºयांनी व्यक्त केले समाधान
लोकमत आॅनलाईन
पारोळा, दि. ४ : येथील कृषी उपन्न बाजार समितीमध्ये १ फेब्रुवारीपासून नविन पध्दतीने शेतमालाच्या लिलावास सुरूवात झाल्याने तसेच मालास उत्तम भाव मिळाल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे .
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाच्या नवीन लिलावास सुरुवात झाली आणि शेतकºयांच्या मालास पहिल्याच दिवशी विक्रमी भाव मिळाला. या पध्दतीमुळे शेतकरी समाधानी असल्याच्या प्रतिक्रिया माल विक्रीस आणलेल्या अनेकांनी व्यक्त केल्या. या वेळी बाजार समितीतर्फे शेतकºयांचा गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सभापती अमोल पाटील यांच्यासह संचालक व शेतकरी उपस्थित होते.