जळगावात वांग्याचे भाव गडगडगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:57 AM2018-11-22T11:57:31+5:302018-11-22T12:00:36+5:30
ग्राहकांना दिलासा
जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत वांगाच्या भावात ४०० रुपये प्रती क्विंटलने घट होऊन वांगे ९०० रुपये प्रती क्विंटलवरून ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. सोबतच कांदा, भेंडी, कारले, वांगे यांचे भावदेखील कमी झाले आहे.
हिवाळ््याच्या सुरुवातीपासून तसे वांग्याची आवक वाढून कमी होत असतात. मात्र मध्यंतरी वांग्याची आवक कमी होऊन तीन आठवड्यांपूर्वी केवळ २२ क्विंटल वांग्याची आवक झाली होती. त्यामुळे भाव वाढ होऊन ते १२०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले होते. मात्र या आठवड्यात वांग्याची आवक वाढून गेल्या आठवडयात ९०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या वांग्याच्या भावात थेट ४०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. भाव अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ४७५ रुपये प्रती क्विंटल असलेल्या कांद्याचे भाव कमी होऊन ते २०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. कोथिंबीरचेही भाव ५०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते २५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत.