भाव गडगडल्याने कांदा उत्पादक हवालदिल

By admin | Published: January 20, 2017 12:27 AM2017-01-20T00:27:30+5:302017-01-20T00:27:30+5:30

चोपडा : तालुक्यात अनेक गावांमध्ये कांद्याचे उत्पादन, कांद्याला हमीभाव देण्याची मागणी

Prices fall due to price hike | भाव गडगडल्याने कांदा उत्पादक हवालदिल

भाव गडगडल्याने कांदा उत्पादक हवालदिल

Next

चोपडा : तालुक्यात सर्वत्र कांद्याचे  मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आता कांदा काढणीवर आलेला असतांनाच भाव एकदम गडगडले आहेत. बाजारात अवघ्या 110 ते 240 रुपये प्रती मणानुसार कांद्याची खरेदी होऊ लागली आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने, कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. सततच्या भाव घसरणीने शेतकरी हवालदिल झाला आहे.
चोपडा तालुक्यात पाण्याची मुबलकता मोठय़ा प्रमाणावर असल्याने, येथे केळी पाठोपाठ कांद्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. तालुक्यातील अडावद, चहार्डी, लासूर, धानोरा, चुंचाळे ही गावे कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. तालुक्यात जवळपास दोन ते अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे उत्पन्न घेतले जाते.
कांद्याचे उत्पन्न आल्यावर व्यापारी एजंटामार्फत शेतावर जाऊन कांद्याची खरेदी करीत असतात. तर अडावद येथे असलेल्या उपबाजार समितीत कांद्याची खरेदी केली जाते. अडावद हे कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते.
 येथील  मार्केट मधील कांदा देशाच्या कानाकोप:यात विक्रीसाठी पाठविला जातो.
अपेक्षित भाव नाही
कांद्याचे उत्पन्न निघण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र बाजारात अवघ्या 110 ते 240 रुपये प्रती मण (40 किलो) भावाने कांदा खरेदी होऊ लागला आहे. म्हणजे हा कांदा तीन ते चार रुपये किलो दराने खरेदी होत आहे.
खेळते भांडवलाचा अभाव
 देशभरात 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदी लागू झाल्याने जुन्या नोटांनी होणारा खरेदी विक्री व्यवहार थांबला. व्यापारी माल  खरेदी करण्यास आधी व्यापारी तयार होत नव्हता. त्यामुळे शेतक:यांनी शेतातून कांदा काढणे थांबविले. मात्र जास्त वेळ कांदा जमिनीत राहिल्यास प्रत खराब होते म्हणून नाईलाजास्तव शेतक:याला कांदा शेतातून काढावा लागला. तसेच  लाल कांदा साठविता येत नसल्याने बाजारात आणणे आवश्यक असते. मात्र बाजारात कांदा आणल्यावर रोख रकमेअभावी व्यापारी कमी दराने माल खरेदी करतात. तसेच माल विकल्यावर लागलीच पैसे मिळत नाही. मजुरांना देण्यासाठी दहा वीस हजार रुपये धनादेशाने  शेतक:याला दिले जातात. मात्र बँकेतही गर्दी असल्याने शेतक:याला रोख रकमेसाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागत असते.
बँकेतून व्यापा:यांना पैसा तुटपुंजा
    व्यापा:यांना चालू  खात्यातील पैसे काढण्यासाठी बंधने असल्यामुळे त्यांना त्या प्रमाणातच कांदा खरेदी करावा लागतो. याचा फटका माल घेणारे व्यापारी, किरकोळ व्यापारी यांच्यावरही होत असल्याने बाजारातील आलेल्या मालास कमी किंमत दिली जाते.
डिङोलचा भाववाढीचा परिणाम
नोटाबंदी झाल्यापासून आतापयर्ंत दोन वेळा डिङोलच्या दारात भाववाढ झाली आहे. त्यामुळे मालवाहतुकीचे दरही वाढल्याने व्यापारी त्याचा भार कांदा उत्पादकांवर टाकत असतात. परिणामी शेतक:यांना भाव कमी दिला जातो.
उत्पादन आल्यावरच कांद्याचा भाव कमी होत असतो. त्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजी असून, कांद्याला हमीभाव देण्याची मागणी होत आहे.                     
 (वार्ताहर)
कांदा उत्पादकाला शेत नांगरणी, वखरणी, वाफे बनविणे, बियाणे टाकणे, रोप तणविरहित ठेवणे, रोप लागवड करणे, निंदणी, खांडणी यासाठी प्रचंड खर्च लागतो.
4जेवढा खर्च करावा लागतो, त्यापेक्षा निम्मेच किंमत मिळत असल्याने, शेतकरी हवालदिल झालेला आहे. कांदा काढावा की नाही, असा गहन प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिलेला आहे.

Web Title: Prices fall due to price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.