आवक वाढल्याने गव्हाच्या भावात १०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:34 PM2018-03-23T12:34:53+5:302018-03-23T12:34:53+5:30

जळगाव जिल्हा, शिरपूर, नंदुरबारसह मध्यप्रदेश, गुजरात येथून गव्हाची प्रचंड आवक

Prices of wheat fell by Rs 100 to Rs | आवक वाढल्याने गव्हाच्या भावात १०० रुपयांनी घसरण

आवक वाढल्याने गव्हाच्या भावात १०० रुपयांनी घसरण

Next
ठळक मुद्देभावात अजून घसरण होण्याची शक्यताग्राहकी वाढेना

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २३ - बाजारपेठेत गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी पाहिजे तशी ग्राहकी नसल्याने गव्हाच्या भावात दोनच दिवसात १०० रुपये प्रति क्विंटलने घसरण झाली आहे. ग्राहकांची खरेदीबाबतची मानसिकता बदलत असल्याने हा परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
धान्य खरेदीच्या हंगामात यंदा मार्च महिना अर्ध्याहून अधिक उलटला तरी बाजारपेठेत पाहिजे तशी ग्राहकी नसल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे. त्यात सध्या गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. जळगाव जिल्हा, शिरपूर, नंदुरबारसह मध्यप्रदेश, गुजरात येथून गव्हाची प्रचंड आवक होत आहे.
बाजारात मोठ्या प्रमाणात आवक सुरू असली तरी पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक बाजाराकडे वळलेला नाही. मध्यंतरी झालेले ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस या मुळे गव्हाच्या दर्जावर परिणाम होण्याच्या भीतीने खरेदीच्या बाबतीत ग्राहक हात आखडता घेत आहे. त्यात सध्या मार्च अखेर असल्याने आर्थिक बाजूचाही विचार केला जात आहे. एप्रिलमध्ये उन्हाचे प्रमाण वाढून गव्हातील ओलावादेखील निघेल या विचाराने ग्राहक एप्रिल महिन्यात धान्य खरेदीच्या विचारात असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.
त्यामुळे सध्या ग्राहकी अभावी गव्हाच्या भावात १०० रुपये प्रति क्विंटलने घसरण झाली. दोन दिवसांपूर्वी २१२५ रुपये प्रति क्विंटल असलेले १४७ गव्हाचे भाव २०२५ रुपये प्रति क्विंटलवर खाली आहे. तसेच २००० ते २०१५ असलेले लोकवन गव्हाचे भाव १९०० ते १९२५ रुपये प्रति क्विंटलवर आले.
आणखी भाव कमी होण्याची शक्यता
अद्याप राजस्थानमधून येणा-या गव्हाची आवक सुरू झालेली नाही. ती आवक सुरू झाली की, गव्हाचे भाव आणखी ५० रुपये प्रति क्विंटलने कमी होण्याचा अंदाज व्यापा-यांनी वर्तविला आहे.

सध्या बाजारात गव्हाची आवक वाढली असून ग्राहकी नसल्याने गव्हाच्या भावात १०० रुपये प्रति क्विंटलने घसरण झाली आहे. यात आणखी ५० रुपये प्रति क्विंटलने घसरण होण्याची शक्यता आहे.
- विजयकुमार वाणी, धान्य व्यापारी.

Web Title: Prices of wheat fell by Rs 100 to Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.