रेल्वे सप्ताहात कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:17 AM2021-02-13T04:17:24+5:302021-02-13T04:17:24+5:30

पुणे-हावडा दरम्यान मंगळवारपासून विशेष गाडी जळगाव : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे १६ फेब्रुवारीपासून पुणे ते हावडा दरम्यान दररोज ...

Pride of staff during Railway Week | रेल्वे सप्ताहात कर्मचाऱ्यांचा गौरव

रेल्वे सप्ताहात कर्मचाऱ्यांचा गौरव

Next

पुणे-हावडा दरम्यान मंगळवारपासून विशेष गाडी

जळगाव : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे १६ फेब्रुवारीपासून पुणे ते हावडा दरम्यान दररोज गाडी धावणार आहे. पुण्याहून ही गाडी सायंकाळी साडेसहा वाजता, निघणार असून, तिसऱ्या दिवशी हावडा येथे दुपारी चार वाजता पोहचणार आहे. या गाडीला जळगाव येथे थांबा देण्यात आला असून, तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशानांच प्रवेश देण्यात येणार आहे.

योगेश पाटील यांची निवड

जळगाव : अखिल भारतीय छावा मराठी संघटनेच्या जळगाव महानगर उपाध्यक्षपदी योगेश पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव मराठे यांच्याहस्ते पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष नंदू पाटील, महानगर कार्याध्यक्ष किशोर पाटील उपस्थित होते.

बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईची मागणी

जळगाव : शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर नागरिक बेशिस्तपणे वाहने उभी करत असल्यामुळे, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे रस्त्यावरून पायी चालणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या वाहनधारकांवर कारवाईची मागणी नागरिकांमधुन होत आहे.

शहरातील दुभाजकांची स्वच्छता करण्याची मागणी

जळगाव : शहरातील ठिकठिकाणच्या दुभाजकांवर मोठ्या प्रमाणावर कचरा साचून पडल्यामुळे, दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या झाडांच्या वाढीवर परिणाम होत आहे. तरी मनपा प्रशासनाने दुभाजक स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.

पॅसेंजर सुरू करण्याची मागणी

जळगाव : मुंबईत लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते देवळाली दरम्यान पॅसेंजर सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांमधुन होत आहे. सध्या ही गाडी बंद असल्यामुळे प्रवाशांना व चाकरमान्यांना जादा पैसे मोजून खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत असून, नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Web Title: Pride of staff during Railway Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.