‘प्राथमिक’ला शिक्षणाधिकारी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 02:12 PM2019-06-29T14:12:16+5:302019-06-29T14:14:40+5:30
दोन महिन्यांपासून पद रिक्त : बी़ जे़ पाटील यांच्याकडेच अतिरिक्त जबाबदारी
जळगाव : १७ जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु झाल्या. शाळा उघडल्या मात्र, या शाळांचा कारभार पाहणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागाला गेल्या दोन महिन्यापासून शिक्षणाधिकारी मिळत नाही, अशी स्थिती आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांच्याकडे या प्राथमिक विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे़
माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांची नाशिक येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांची बदली झाली़ गेल्या दोन महिन्यापासून प्राथमिक शिक्षणाधिकारी हे पद रिक्त आहे़ त्यातच शिक्षकांच्या बदल्या, समूपदेशन प्रक्रियेचा घोळ, अन्य प्रशासकीय कामे, गणवेशासंदर्भात दिरंगाई, विद्यार्थी वाढीसाठी हवे तसे प्रयत्न न होणे, आदी बाबी प्रकषाने समोर येत असून याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत़ नुकत्याच समुपदेशन प्रक्रियेची माहिती न देणाºया गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या़ मात्र, त्यांचे खुलासे सादर झाले की नाही याकडेही लक्ष द्यायला कुणी तयार नसल्याचे चित्र आहे़
अधिकारी मिळेना़
माध्यमिकचा पदभार स्वीकारल्यानंतर किमान वर्षभर तरी प्राथमिकचा अतिरिक्त कारभार आपल्यालाच बघावा लागेल असे शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांना सांगण्यात आल्याचे समजते, मात्र, आपण दोन्ही कारभार एकत्र घेण्यास नकार दिला आहे़ हे शक्य नसून यामुळे कामे खोळंबतील आपल्या प्रकृतीवरही याचा परिणाम होत असल्याचे बी़ जे़ पाटील यांनी म्हटले आहे़ मात्र, या ठिकाणी अधिकारीच यायला तयार नसल्याचे समजते.
एका अधिकाºयाकडे दोन विभाग आल्याने कामे थोडीफार खोळंबणार आहेतच़ मात्र, आम्ही शासनाकडे पूर्णवेळ शिक्षणाधिकारी म्हणनू मागणी केली आहे़ लवकरच याठिकाणी अधिकाºयांची नेमणूक होणार असल्याचे शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांनी सांगितले आहे़.