जळगाव जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ योजने’च्या नावाखाली अनेकांची फसवणूक, खासदार रक्षा खडसे यांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 12:50 PM2018-01-27T12:50:50+5:302018-01-27T13:01:49+5:30

आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

'Prime Minister Beti Bachao Yojana' many people cheated | जळगाव जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ योजने’च्या नावाखाली अनेकांची फसवणूक, खासदार रक्षा खडसे यांचा गौप्यस्फोट

जळगाव जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ योजने’च्या नावाखाली अनेकांची फसवणूक, खासदार रक्षा खडसे यांचा गौप्यस्फोट

Next
ठळक मुद्दे10 ते 15 हजार अर्ज भरलेएजंटांमार्फत सर्वसामान्यांची लूट

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27-  बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रमांतर्गत ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ योजना’ राबविली जात असून त्यात मुलीच्या विवाहप्रसंगी दोन लाख रुपये दिले जाणार असल्याचे सांगून जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात अर्ज भरले जात आहे. यामाध्यमातून नागरिकांची फसवणूक सुरू असून अशी कोणतीच योजना नसल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. यास जनतेने बळी न पडण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 
या संदर्भात रक्षा खडसे यांनी पत्रपरिषद घेऊन ही माहिती दिली. या वेळी त्या म्हणाल्या की, ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ योजना’ असल्याची अफवा पसरवून त्याचे छापील अजर्ही तयार करण्यात आले आहे. हे अर्ज ङोरॉक्सच्या दुकानावरून बिनबोभाटपणे विक्री होत असून सामान्य नागरिक त्यास बळी पडत आहे. 

एजंटांमार्फत सर्वसामान्यांची लूट
ङोरॉक्सच्या दुकानावर दोन रुपयांना एक अर्ज विक्री होत असून हे अर्ज भरणे व ते पाठविण्यासाठी बहुतांश ठिकाणी एजंटांमार्फत 200 ते 500 रुपये उकळले जात आहे. या शिवाय बरेच नागरिक स्वत: अर्ज भरुन भारत सरकार, महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालयाच्या पत्त्यावर टपालाने पाठवित आहे. 

10 ते 15 हजार अर्ज भरले
रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यात हा प्रकार जास्त असून जिल्ह्यातही तो सुरू असण्याची शक्यता खासदार खडसे यांनी वर्तविली. यामध्ये 10 ते 15 हजार अर्ज भरले गेले असून एका अर्जासाठी 32 ते 35 रुपये खर्च येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या शिवाय एजंट वेगळी रक्कम घेतात. त्यामुळे नागरिकांची फसगत करून केवळ लूट केली जात असल्याचे खडसे यांचे म्हणणे आहे. 

सरपंचांची सही आवश्यक
6 ते 32 वयोगटातील मुलींसाठी ही योजना असून हा अर्ज भरल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी दोन लाख रुपये मिळणार असल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. या अर्जावर मुलीचे छायाचित्र लावण्यासह कुटुंबाची माहिती, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड अशी सविस्तर माहिती असलेले बनावट अर्ज तयार करण्यात आल्याचे खासदार खडसे म्हणाल्या. विशेष म्हणजे यावर गावातील सरपंचांची सहीदेखील आवश्यक असून सरपंचांद्वारेही गावातील मुलींचे काम असल्याने सह्या दिल्या जात असल्याचे चित्र आहे. 

बळी पडू नका
केंद्राची अशी कोणतीही योजना नसून नागरिकांनी यास बळी पडू नये, असे सांगत खासदार खडसे यांनी बाबत अधिका:यांकडूनही माहिती घेतली. मात्र योजनाच नसल्याचेसांगण्यातआले.

Web Title: 'Prime Minister Beti Bachao Yojana' many people cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.