पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले जळगावातील मू़जे़ महाविद्यालयातून शिक्षण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:35 PM2018-09-25T15:35:30+5:302018-09-25T15:44:07+5:30

दोन दिवसांपूर्वीच जळगाव पोलीस दलाच्या संकेस्थळावर छेडखानी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता पुन्हा असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव इंटरनेटवर ‘सर्च’ करताच त्यांचे शिक्षण जळगावातील मू़जे़ महाविद्यालयात झाले असल्याचे दिसून येत आहे़

Prime Minister Narendra Modi took education from Jaljavai College of Jalgaon? | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले जळगावातील मू़जे़ महाविद्यालयातून शिक्षण?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले जळगावातील मू़जे़ महाविद्यालयातून शिक्षण?

googlenewsNext
ठळक मुद्देसंकेतस्थळावर पुन्हा छेडखानीचा प्रकारदोन दिवसांपूर्वी झाली होती पोलीस दलाच्या संकेतस्थळावर छेडछाडपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

जळगाव : दोन दिवसांपूर्वीच जळगाव पोलीस दलाच्या संकेस्थळावर छेडखानी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता पुन्हा असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव इंटरनेटवर ‘सर्च’ करताच त्यांचे शिक्षण जळगावातील मू़जे़ महाविद्यालयात झाले असल्याचे दिसून येत आहे़ या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे़
इंटरनेटवर पी़एम़ नरेंद्र मोदी हे नाव टाईप केल्यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण नाव तसेच जन्मतारीख यासह त्यांच्या पत्नी, आई-वडिलांचे नाव दिसून येते. मोदी यांनी त्यांचे शिक्षण गुजरात विद्यापीठ तसेच जळगावातील मू़जे़ महाविद्यालयातून घेतले असल्याचे दिसून येते. दरम्यान, मू़जे़ महाविद्यालय या नावावर क्लिक केल्यानंतर मू़जे़ महाविद्यालयाची संपूर्ण माहिती समोर येत आहे़या प्रकाराबाबत जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने मू़जे़ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ उदय कुळकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़ पोलीस दलाच्या संकेतस्थळावर झालेल्या छेडखानी नंतर हा दुसरा प्रकार समोर आल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे़

Web Title: Prime Minister Narendra Modi took education from Jaljavai College of Jalgaon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.