पुष्पगुच्छा ऐवजी बहिणाबाईच्या कवितांचे पुस्तके देऊन पंतप्रधानांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 08:49 PM2019-02-16T20:49:42+5:302019-02-16T20:49:57+5:30
जळगाव विमानतळावर महापौर, जि.प.अध्यक्षा, आमदारांची उपस्थिती
जळगाव : धुळे येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी जाण्याकरिता नागपूर येथुन विमानानाने जळगाव विमानतळावर आल्यावर महापौर सीमा भोेळे यांनी पंतप्राधान नरेंद्र मोदींना पुष्पगुच्छ न देता, खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. या ठिकाणी तब्बल २२ मिनिटे थांबुन, पंतप्रधान मोदी हे विशेष हेलीकॉप्टरने धुळ्याकडे सभेसाठी रवाना झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर येथील कार्यक्रम आटोपून एअरफोर्सच्या बीबीजे या विशेष विमानानाने जळगाव विमानतळावर शनिवारी दुपारी २ वाजता दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत यवतमाळ येथुनच राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत होते.
बहिणाबाईचे पुस्तक देऊन मोदींचे स्वागत
जळगाव विमातळावर मोदींचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, जि.प. अध्यक्षा उज्जवला पाटील, जिल्हाधिकारी डॉ. उदय ढाकणे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते. विमानातून उतरताच, स्वागतासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना मोदी यांनी हात जोडून अभिवादन केले. त्यानंतर महापौरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या कवितांचे लेखीका प्रमिला भिरुड यांनी अनुवाद केलेले पुस्तक भेट देऊन, अनोख्या पद्धतीने स्वागत केले. यानंतर ही मंडळी धुळ्याकडे हेलिकॉप्टरने रवाना झाले.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळावर व विमानतळ परिसराच्या बाहेरील सर्व रस्त्यावर सकाळपासून शस्त्रधारी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. विमानतळावर तपसाणीनंतरच प्रत्येकाला प्रवेश दिला जात होता. अजिंठा चौकापासून ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. धुळ्याची सभा आटोपून मोदी हे सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान जळगाव विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले.
तीन तास ३५ मिनिटे पंतप्रधानांनी दिली खान्देशला
धुळे जिल्ह्यातील कार्यक्रमांसाठी जळगाव विमानतळ व धुळ्याहून दिल्लीकडे प्रयाण करण्याच्या काळात तब्बल तीन तास ३५ मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खान्देशसाठी देऊन विविध विकास कामांचा शुभारंभ धुळे येथून केला. दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी मोदी यांचे जळगाव विमानतळावर खास विमानाने आगमन झाले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने धुळ्याकडे रवाना झाले. धुळे येथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी त्यांचे पुन्हा जळगाव विमानतळावर आगमन झाले व त्यानंतर ५.३० वाजता विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले.