जळगाव विमानतळावर पंतप्रधानांच्या आगमनाचे चोरून चित्रीकरण, सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 09:47 AM2019-02-18T09:47:38+5:302019-02-18T09:47:48+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळे दौऱ्यावर आले असता जळगाव विमानतळावर त्यांच्या आगमनाच्या वेळी कडक सुरक्षा यंत्रणा भेदून काही जणांनी मोदी यांचे मोबाईलमध्ये चोरुन चित्रीकरण केले.

prime minister's arrival in Jalgaon airport, security system loose | जळगाव विमानतळावर पंतप्रधानांच्या आगमनाचे चोरून चित्रीकरण, सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे

जळगाव विमानतळावर पंतप्रधानांच्या आगमनाचे चोरून चित्रीकरण, सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे

Next

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळे दौऱ्यावर आले असता जळगाव विमानतळावर त्यांच्या आगमनाच्या वेळी कडक सुरक्षा यंत्रणा भेदून काही जणांनी मोदी यांचे मोबाईलमध्ये चोरुन चित्रीकरण केले. तब्बल ३ मिनिटे ५७ सेकंदाचा हा व्हिडीओ लोकमतच्या हाती लागला आहे. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी व जळगाव पोलिसांची कडक सुरक्षा यंत्रणा असतानाही साधारण २०० मीटर अंतरावरून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. यावरून सुरक्षा यंत्रणेचा गलथानपणा उघड झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह इतर मंत्री शनिवारी धुळे दौ-यावर होते. त्यासाठी विमानाने ते जळगावात दुपारी १.५० वाजता दाखल झाले. पंतप्रधानांना असलेली कडक सुरक्षा पाहता एक दिवस आधीच राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने विमानतळाचा ताबा घेतला होता. त्याशिवाय हजारो पोलीस, कमांडो, अधिकारी तैनात करण्यात आले होते. असे असताना सुरक्षा यंत्रणेचे कसे धिंडवडे उडविले जातात, याचा व्हिडीओ वायरल झालेला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सुरक्षा यंत्रणेला मोठे आव्हान या व्हिडीओने निर्माण केलेले आहे.

दोनशे मीटर अंतरावरून पाईपातून केले शूटिंग
पंतप्रधानांचे विमान ज्या ठिकाणी उतरले, अगदी त्या ठिकाणापासून दोनशे मीटरच्या अंतरावरच पाईपांमधून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. बोली भाषेवरून शूटिंग करणारे स्थानिकच असून ते राजकीय पक्षाशी संबंधित आहेत की विमानतळावर कामाला असलेले लोक आहेत हे स्पष्ट झालेले नाही. किमान पाच ते सहा लोक या ठिकाणी आहेत. हा व्हिडीओ कोणी केलेला आहे, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.

मोदींचा टायगर म्हणून उल्लेख
विमान पोहोचल्यानंतर प्रथम सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी विमानातून बाहेर येतात. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव आदी येतात. त्यानंतर एका मिनिटांनी पंतप्रधान मोदी येतात. शूटिंग करणा-यांच्या तोंडून सर्वच मंत्र्याचे नाव घेतले जाते. त्यानंतर मोदी जेव्हा विमानातून बाहेर येतात, तेव्हा त्यांचा टायगर म्हणून हे उल्लेख करतात. या सगळ्यांचे चोरून चित्रीकरण यात करण्यात आले आहे.

काय आहे व्हिडीओत
व्हिडीओ तयार करणाºयांमध्ये संवादही सुरु आहे. मोबाईल व्यवस्थित घ्या, वर घेऊ नका..स्वप्नील भाऊ कोणाला त्रास व्हायला नको..गडकरी साहेब आले..फडणवीस साहेब भी आहे रे भो...अरे मोदी साहेब येताहेत अजून...राज्यपाल साहेब येतात...मोदी साहेब नाहीत...दिसलं का रे पगारे भाऊ...अजून दिसलं नही तुले..काळ्या कपड्यावर दिसत नाही का तुले...बरं..बरं..एन्ट्री होतेय..राज्यपालांच्या बाजुला आमदार, एस.पी.साहेब...असे म्हणत असतानाच मोदी विमानातून बाहेर येतात...तेव्हा आला रे बाप...टायगर आला टायगर असे संवाद या व्हिडीओत आहेत.

पोलीस अधीक्षकांकडून प्रतिसाद नाही
या प्रकाराबात पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवर दोनवेळी संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: prime minister's arrival in Jalgaon airport, security system loose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.