दीपनगर प्रकल्पात रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:12 PM2018-03-30T13:12:32+5:302018-03-30T13:12:32+5:30

दीपनगर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषणच्या विविध प्रकल्पांचे एकत्रित भूमिपूजन

Priority to employment in Deepnagar project | दीपनगर प्रकल्पात रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दीपनगर प्रकल्पात रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Next
ठळक मुद्देमहानिर्मितीच्या भुसावळ ६६० मेगावाट विद्युत प्रकल्पाचे भूमिपूजनमहावितरणचे जळगाव मंडळ अंतर्गत ८ प्रकल्पांचे भूमिपूजनमहापारेषणचे जळगाव जिल्ह्यातील ४ प्रकल्पांचे भूमिपूजन

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ३० - महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या दीपनगर (भुसावळ) येथील ६६० मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी ३० मार्च रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. या वेळी बोलताना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, दीपनगर प्रकल्पासाठी ज्यांची जमीन गेली आहे, त्यांना रोजगारात प्राधान्य दिले जाईल. तसेच बाधीत गावांच्या विकासाठीही प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
महावितरणच्या जळगाव परिमंडळ अंतर्गत पंडित दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजने अंतर्गत दहिवद (ता.अमळनेर), तालखेडा (भोटा) ता. मुक्ताईनगर व बक्षीपूर (ता. रावेर) आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत सावदा, रावेर, फैजपूर, अमळनेर, भडगांव (वडदे) या ३३/ ११ के.व्ही. उपकेंद्राच्या कामांचे भूमिपूजन तसेच महापारेषणच्या२२० केव्ही उपकेंद्र केकतनिंभोरा ता. जामनेर, २२० केव्ही उपकेंद्र विरोदा ता. यावल, १३२ केव्ही उपकेंद्र कर्की ता. मुक्ताईनगर, १३२ केव्ही उपकेंद्र कोथळी ता. भडगावचे भूमिपूजनदेखील झाले.
यावेळी जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील या उपस्थित होत्या.
माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, चंदुलाल पटेल, डॉ. संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होेते.

Web Title: Priority to employment in Deepnagar project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.