जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांचे उपोषण
By Admin | Published: May 13, 2017 05:55 PM2017-05-13T17:55:04+5:302017-05-13T17:55:04+5:30
मानसिक त्रासाला कंटाळून कारागृहातील सुमारे 250 कैद्यांनी उपोषण केले.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 13 - जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधीक्षक एस़एस़ कुंवर यांच्याकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून कारागृहातील सुमारे 250 कैद्यांनी उपोषण केले. कुंवर यांनी कैद्यांची समजूत घातली़ त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले, याबाबतची माहिती कैद्यांच्यावतीने छावा संघटनेचे संतोष पाटील यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, कैद्यांनी उपोषण केले नाही व कोणताही त्रास दिला नसल्याचे कुंवर यांनी सांगितले. कैद्यांच्या उपोषणाची शहरात दिवसभर चर्चा होती़
संतोष पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, कारागृहात किरकोळ मारहाणीची घटना घडली होती़ या घटनेनंतर कुंवर यांनी कैदी व नातेवाईकांची भेट होऊ दिली नाही, वकिलांना सुद्धा भेटू दिले नाही़ को:या कागदावर आमच्या सर्वाच्या सह्या घेतल्या जात आहेत़ तसेच ऐकले नाहीतर पोलीस दल व एसआरपी बोलाविण्यात येईल, अशी धमकी दिली. तसेच पैशांची मागणी केली जात असून पैसे न दिल्यास कारागृह बदलवून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचे कैद्यांच्या तक्रारी अर्जात नमूद आह़े
कारागृहातील 1 ते 12 नंबरच्या बॅरेकमधील जवळपास अडीचशेवर कैद्यांनी मुख्य न्यायाधीश यांच्या नावे तक्रार अर्ज लिहिला़ मुख्य न्यायाधिशांच्या नावे लिहिलेला अर्ज कैद्यांच्यावतीने संतोष पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिला़ अर्जासोबत कारागृहातील एक ते बारा बॅरेकमधील जवळपास 250 च्यावर कैद्यांच्या स्वाक्ष:या आहेत़
कारागृहात उपोषण झाले नाही़ कोणत्याही कैद्याकडून को:या कागदावर स्वाक्ष:या घेण्यात आलेल्या नाही़ कैद्यांनी उपोषण केले असते, तर ही बाब जिल्हाधिका:यांना कळविली असती़ कारागृहातील कारभार सुरळीत सुरू आहे. त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही.
- एस़एस़ कुंवर, प्रभारी कारागृह अधीक्षक