कैद्यांच्या बहिणींना परवानगी नाकारली संस्थेच्या कार्यकर्त्यांना मात्र प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:51 PM2018-08-27T13:51:06+5:302018-08-27T13:55:22+5:30

बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण रविवारी शहरात उत्साहात साजरा होत असतानाच जिल्हा कारागृह प्रशासनाने मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे कारण देत यंदा कैद्यांच्या बहिणींना रक्षाबंधनासाठी प्रवेश नाकारला. मात्र सामाजिक संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांना रक्षाबंधनासाठी प्रवेश दिला. त्यामुळे बहिणींनी नाराजी व्यक्त केली.

Prisoners refused permission, but only the admissions of the organization workers | कैद्यांच्या बहिणींना परवानगी नाकारली संस्थेच्या कार्यकर्त्यांना मात्र प्रवेश

कैद्यांच्या बहिणींना परवानगी नाकारली संस्थेच्या कार्यकर्त्यांना मात्र प्रवेश

Next
ठळक मुद्देजळगाव जिल्हा कारागृह प्रशासनाची मनमानीरक्षाबंधनाच्या आनंदावर विरजणदीड ते दोन तास केली प्रतीक्षा

जळगाव : बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण रविवारी शहरात उत्साहात साजरा होत असतानाच जिल्हा कारागृह प्रशासनाने मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे कारण देत यंदा कैद्यांच्या बहिणींना रक्षाबंधनासाठी प्रवेश नाकारला. मात्र सामाजिक संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांना रक्षाबंधनासाठी प्रवेश दिला. त्यामुळे बहिणींनी नाराजी व्यक्त केली.
भावाची भेट होईल या प्रतीक्षेत सुमारे दीड-दोन तास कारागृहाबाहेरच बसून या बहिणी हताश होऊन परतल्या. दरवर्षी रक्षाबंधनच्या दिवशी कारागृहातील कैद्यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या बहिणी तसेच सामाजिक संस्थांच्या महिला कार्यकर्त्याही येत असतात. त्या सर्वांनाच रक्षाबंधनासाठी प्रवेश दिला जातो. मात्र यंदा महानिरीक्षक कारागृह यांनी त्यांच्या कार्यालयाकडून पूर्वपरवानगी घेतलेल्यांनाच रक्षाबंधन कार्यक्रमासाठी सोडण्याचे आदेश काढले.
कारागृह अधीक्षक बी.बी.श्रीराव यांनी रविवार, २६ रोजी रक्षाबंधनासाठी आलेल्या कैद्यांच्या बहिणींना प्रवेश नाकारला. त्यामुळे या महिला कारागृहाच्या भिंतीजवळच बसून होत्या. तर त्यानंतर थोड्याच वेळात प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या तेथे पोहोचल्या. त्यांनी यापूर्वीच उपमहानिरीक्षक कार्यालयाची परवानगी घेतलेली असल्याने त्यांना मात्र लगेच प्रवेश देण्यात आला. सख्या बहिणी रक्षाबंधनापासून वंचित राहिल्या. मात्र मानलेल्या बहिणींनी त्याची कसर भरून काढत या भावांना राखी बांधली. कारागृह प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे नाराजी व्यक्त झाली.

Web Title: Prisoners refused permission, but only the admissions of the organization workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.