जळगावात प्रवाशांची सर्रास लूट, खाजगी आराम बसचे भाडे दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:58 PM2018-04-29T12:58:46+5:302018-04-29T12:58:46+5:30

शासकीय आदेशाला केराची टोपली

private buses fares doubled | जळगावात प्रवाशांची सर्रास लूट, खाजगी आराम बसचे भाडे दुप्पट

जळगावात प्रवाशांची सर्रास लूट, खाजगी आराम बसचे भाडे दुप्पट

Next
ठळक मुद्देबसच्या भाड्यापेक्षा दुप्पटमोबाईलवरून मिळतात भाड्याचे दर

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २९ - शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागताच शहरातीलखाजगी आराम बसचे भाडे दुप्पट झालेअसूनप्रवाशांची सर्रास लूट सुरू झाली आहे. एरव्ही ४५० ते ५५० रुपये असलेले पुण्याचे भाडे आता ९०० ते एक हजार रुपयांवर पोहचले आहे. एसटी महामंडळाच्या भाड्यापेक्षाही हे भाडे दुप्पट असल्याने शासकीय आदेश धाब्यावर ठेवले जात असल्याचे ‘लोकमत’ने शनिवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान आढळून आले.
सणवार, सुट्या काळात दरवर्षी खाजगी आराम बसचे भाडे अव्वाच्या सव्वा केलेजाते, या प्रकाराला आळा बसावा म्हणून शासनाने ही भाडेवाढ एसटी महामंडळाच्या बसेस्च्या भाड्यापेक्षा दीडपटपेक्षा जास्त नको असे आदेश काढले. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याचे जळगाव शहरात दिसून आले.
सुट्याच्या पार्श्वभूमीवर जळगावातून पुणे, मुंबई व इतर शहरात जाणाऱ्यांची तसेच येणाºयांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे खाजगी आराम बसच्या शहरातील काही कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष भाड्याबाबत विचारणा केली असता आलेले अनुभव असे...
शेवटच्या सीटसाठी ८४० तर पुढच्या सीटसाठी १०५० रुपये
स्टेडिअम परिसरातील एका खाजगी आराम बसच्या कार्यालयात पुणे येथे जायचे असून भाडे किती आहे, असे विचारले असता शनिवारचे भाडे ८४० रुपये एका प्रवाशासाठी होते. (ते देखील शेवटचे सीट शिल्लक असल्याने कमी झाले आहे, असेही सांगण्यात आले.) पुढचे सीट पाहिजे असे म्हटल्यावर, उद्या रविवार असल्याने एका प्रवाशासाठी १०५० रुपये लागतील, असे उत्तर मिळाले. मुंबईचे भाडे विचारले असता १२०० रुपये लागतील असे सांगण्यात आले.
शेवटचे सीट आहे, ५० रुपये कमी करून देईल
स्टेडिअम परिसरातील दुसºया एका कार्यालयात जाऊन विचारणा केली असता या ठिकाणी पुणे येथे जाण्यासाठी ९०० रुपये लागतील असे सांगण्यात आले. हे सीट वरचे (अप्पर) असल्याचीही माहिती त्यांनी दिली. दुसरे कोणतेही सीट शिल्लक नाही. तेथून माघारी परतत असताना शेवटचे सीट आहे, ५० रुपये कमी करून देतो असे सांगण्यात आले.
मोबाईलवरून मिळतात भाड्याचे दर
दुसºया एका खाजगी कंपनीच्या कार्यालयात जाऊन पुण्याचे व मुंबईचे भाडे विचारले असता शनिवारसाठी पुण्याचे ९५० रुपये लागतील तर मुंबईचे भाडे १२०० रुपये लागतील असे सांगण्यात आले. रविवारचे भाडे विचारले असता मोबाईलवर पाहून भाडे सांगण्यात आले. इतर कंपनीच्या कार्यालयांमध्येही जाऊन विचारणा केली असता ९००, ९५०, एक हजार रुपये पुण्याचे भाडे असल्याची माहिती मिळाली.
सिझन सुरू झाले, भाडे वाढणारच
पुणे व मुंबईचे भाडे दुप्पट का? असे विचारले असता आता सिझन सुरू झाल्याने भाडेवाढ झाल्याचे सांगण्यात आले. पुणे येथून परतीचे भाडेही वाढले असून तेदेखील दुप्पटपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले.
बसच्या भाड्यापेक्षा दुप्पट
सध्या एसटी महामंडळाच्या बसेस्चे जळगाव ते पुण्याचे भाडे ५०० रुपये आहे तर रातराणीचे भाडे ५५० रुपये आहे. शिवशाही बसचे भाडे ६४० रुपये आहे.
परिवहन मंत्र्यांच्या आदेशाचे काय?
सणवार, सुट्यांच्या काळात खाजगी आराम बसचे भाडे वाढविले तर दीडपट पेक्षा जास्त नको, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले असताना जळगावात मात्र दुप्पट भाडे आकारले जात आहे. त्यामुळे शासकीय आदेशाचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: private buses fares doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.