खासगीत केद्रांना परवानगी, मात्र लस उपलब्धतेबाबत अनिश्चितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:14 AM2021-05-17T04:14:35+5:302021-05-17T04:14:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लसीकरणाला गती यावी, यासाठी आता जिल्ह्यातील २९ खासगी केंद्रांना लस विकत घेण्याची परवानगी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लसीकरणाला गती यावी, यासाठी आता जिल्ह्यातील २९ खासगी केंद्रांना लस विकत घेण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, अद्याप सर्व प्रक्रिया प्राथमिक स्तरावर असून, लस उपलब्धतेबाबत अनिश्चितता असल्याचे खासगी केंद्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, आठवडाभरात याबाबत चित्र स्पष्ट हाेणार असून, आता स्पुटनिक ही लसही खासगी केंद्रात उपलब्ध होऊ शकणार आहे.
खासगी केंद्रांना थेट कंपन्यांकडून लस विकत घेता येणार आहे. मात्र, शासकीय यंत्रणेकडे त्यांना रिपोर्टिंग करणे बंधनकारक राहणार आहे. प्राथमिक स्तरावर अद्याप ही प्रक्रिया सुरू असून, कंपन्यांकडे लस उपलब्ध होईल, त्यानुसार पुढील प्रक्रिया साधारण आठवडाभरानंतर सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नागरिकांना ऐच्छीक
नागरिकांनी पहिला डोस शासकीय घेतल्यानंतर ते दुसरा डोस खासगीत किंवा पहिला डोस खासगीत घेतल्यानंतर दुसरा डोस शासकीय केंद्रात घेऊ शकणार आहे. हे नागरिकांना ऐच्छीक असल्याची माहिती आहे.
प्रशासकीय नियंत्रण
खासगी केंद्रांना थेट कंपन्यांकडून लस उपलब्ध करून घेता येणार आहे. मात्र, यावर शासकीय नियंत्रण राहणार असल्याची माहिती डॉ. समाधान वाघ यांनी दिली आहे.
असे असू शकतात दर
काेविशिल्ड ८०० रुपयांपर्यंत
कोव्हॅक्सिन १३०० रुपयांपर्यंत
स्पुटनिक १५०० रुपयांपर्यंत
शहरातील खासगी केंद्र
नेहते हॉस्पिटल डाॅ. याेगेंद्र नेहेते, जैन इरिगेशन सिस्टीम चंद्रकांत नाईक, कमल हॉस्पिटल डाॅ. राजेंद्र भालाेदे, विजेंद्र हॉस्पिटल, डाॅ. पराग चाैधरी, विश्वप्रभा हॉस्पिटल डाॅ. राजेश पाटील, कांताई नेत्रालय अमरेंद्रनाथ चाैधरी, रोटरॅक्ट क्लब डाॅ. पारस जैन, विश्व हिंदू परिषद हरीष मुंदडा, महेश प्रगती मंडळ आनंद पलाेड यांचा समावेश आहे.