अनलॉकनंतर खासगी कालीपिली प्रवासी वाहनेही सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:23+5:302021-06-17T04:12:23+5:30

महामंडळातर्फे गेल्या आठवड्यापासून जिल्हाभरात सर्वत्र बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बसफेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे ...

Private Kalipili passenger vehicles are also available after unlocking | अनलॉकनंतर खासगी कालीपिली प्रवासी वाहनेही सुसाट

अनलॉकनंतर खासगी कालीपिली प्रवासी वाहनेही सुसाट

Next

महामंडळातर्फे गेल्या आठवड्यापासून जिल्हाभरात सर्वत्र बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बसफेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे याचा फायदा खासगी कालीपिली प्रवासी वाहनधारक घेत आहेत. पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव, जामनेर, भुसावळ या भागातून दररोज मोठ्या संख्येने खासगी कालीपिली गाड्या जळगावला प्रवासी वाहतूक करताना दिसून येत आहेत. तसेच खासगी कालीपिली वाहनधारक एसटी बसपेक्षा १० ते १५ रुपयांनी भाडे कमी घेत आहेत. यामध्ये चाळीसगाव ते जळगाव एसटीचे भाडे १२० रुपये असताना, कालीपिली चालक १०० रुपये भाडे घेत आहेत. एरंडोलहून जळगावचे बसचे भाडे ४० रुपये असताना, कालीपिली धारक ४० रुपये घेत आहेत. प्रत्येक मार्गावर अशा प्रकारे कालीपिली वाहनधारकांकडून प्रवासी आकर्षित होण्यासाठी एसटीपेक्षा कमी भाडे घेत असल्यामुळे, या खासगी प्रवासी वाहनांना बसपेक्षा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.

इन्फो :

बसपेक्षा नक्कीच खासगी कालीपिली वाहनचालक भाडे दहा ते पंधरा रुपयांनी कमी घेतात. तसेच प्रवासी मिळाल्यानंतर लगेच वाहन काढतात. तसेच केव्हाही खासगी वाहने उपलब्ध असल्यामुळे, प्रवाशांचा अनलॉकनंतर या प्रवासी वाहनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

-मुकेश बेदमुथा, अध्यक्ष, जळगाव जिल्हा खासगी ट्रॅव्हल्स असोसिएशन.

Web Title: Private Kalipili passenger vehicles are also available after unlocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.