खासगी कोविड रुग्णालयांचे होणार लेखा परिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:16 AM2021-04-11T04:16:12+5:302021-04-11T04:16:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खासगी कोविड रुग्णालयांमध्ये शासनाने निर्धारीत करून दिलेल्या दरांनुसार रुग्णांकडून बिले घेतली जात आहे की ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खासगी कोविड रुग्णालयांमध्ये शासनाने निर्धारीत करून दिलेल्या दरांनुसार रुग्णांकडून बिले घेतली जात आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लेखा परीक्षकांचे पथक तयार केले आहे. हे पथक खासगी रुग्णालयांचे कोविडच्या काळातील लेखा परीक्षण करणार आहेत.
या पथकात एम.डी. नेहते, एस.के. निकम, नितीन सुतार, राम कुंवर, चेतन गडकर, जितेंद्र आसोदेकर, बी.व्ही. पाटील, आर.एन. बाविस्कर, एम.ए. वळवी, मुकुंद शिंदे, किरण खैरे, गिरीष बाविस्कर, बी.डी. शिंदे, संतोष गवते, संजय बाणाईते, सुरेंद्र केदारे, नितीन राणे, रविंद्र जोशी, अ.अ. देशपांडे, योगेश कुंजीर, ज्ञानेश्वर दिगोळे, जितेंद्र राठोड, अतुल महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पथकातील सर्व अधिकारी हे वेगवेगळ्या रुग्णालयांचे लेखा परीक्षण करणार आहेत.