पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे सीएम चषक स्पर्धेचे पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 07:52 PM2018-12-05T19:52:58+5:302018-12-05T19:54:06+5:30
तामसवाडी येथे सीएम चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रारंभी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात महिलांनी सुरेख प्रबोधनपर रांगोळी काढली. त्यातून कर्ज माफीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार, ‘बेटी बचाव बेटी पढाव, पाणी वाचवा’ यासारख्या विषयांवर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.
पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील तामसवाडी येथे सीएम चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
प्रारंभी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात महिलांनी सुरेख प्रबोधनपर रांगोळी काढली. त्यातून कर्ज माफीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार, ‘बेटी बचाव बेटी पढाव, पाणी वाचवा’ यासारख्या विषयांवर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धांसाठी तामसवाडी गावातून ७०० ते ८०० महिलांनी सहभाग नोंदवला. या सीएम चषकाचे संयोजक अंजली पाटील, महिला बालकल्याण सभापती, नगरसेविका व भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष रावसाहेब गिरासे यांच्या पथकाने नियोजन केले.
५ रोजी या रांगोळी बक्षीस वितरण करण्यात आले. अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष हणमंतराव पवार अध्यक्षस्थानी होते. पं.स.सदस्या सुजाता बाळासाहेब पवार, नगराध्यक्ष करण पाटील, नगरसेविका वर्षा पाटील, पी.जी.पाटील, नगरसेवक भैय्या चौधरी, माजी सरपंच राजेंद्र भास्कर पवार, वसंत अंबू पवार, बंडू पवार, मधुकरराव शेंडे, रोहिदास पवार, बाळू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे वितरित करण्यात आली.
सूत्रसंचालन एम.टी.पाटील यांनी व आभार अंजली पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रावसाहेब गिरासे, विवेक पाटील, साहेबराव खाडे, कैलास पाटील, स्वपींल शेंडे, रवींद्र पवार, भैया पेहलवान, अतुल मराठे, दिनेश लोहार, प्रसाद महाजन, पांडू पाटील, सतीश शिंपी यांनी मदत केली.