भरवस बोगद्याचा प्रश्न मिटणार प्रवाशांचे हाल थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 AM2021-06-21T04:12:11+5:302021-06-21T04:12:11+5:30

भरवस गावाजवळ रेल्वे बोगद्याच्या उजव्या व डाव्या बाजूला रस्ता गेल्या पाच वर्षात अत्यंत दयनीय झाला होता. यामुळे रेल्वे पुलाजवळ ...

The problem of trust tunnel will be solved and the condition of passengers will stop | भरवस बोगद्याचा प्रश्न मिटणार प्रवाशांचे हाल थांबणार

भरवस बोगद्याचा प्रश्न मिटणार प्रवाशांचे हाल थांबणार

Next

भरवस गावाजवळ रेल्वे बोगद्याच्या उजव्या व डाव्या बाजूला रस्ता गेल्या पाच वर्षात अत्यंत दयनीय झाला होता. यामुळे रेल्वे पुलाजवळ पावसाळ्यात पाणी साचून पुलाखालून कच्चा रस्ता आहे. पुलाच्या तर उजव्या आणि डाव्या बाजूला उतार असून यामुळे रस्त्यावरील दोन्ही भागातील पाणी थेट रेल्वे पुलाखाली साचत असे यामुळे पावसाळ्यात मोटारसायकल स्वार व इतर वाहने तासनतास खोळंबून असत यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प होत असे. यामुळे छोटे-मोठे अपघातात वाहनचालक जखमी होत. यासाठी आमदार अनिल पाटील यांनी हा प्रश्न धसास लावला. गेल्यावर्षी कोरोना असल्याने विकासकामे ठप्प होती. यंदा काही प्रमाणात सुरू झाले असल्याने यंदा हे काम आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर केले व त्याचे आता भूमिपूजनदेखील झाले. यामुळे परिसरातील वाहनचालक बैलगाडी मालक शेतकरी यांचा मुख्य प्रश्न सुटला आहे.

या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सदस्य संभाजी लोटन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डाॅ. रामराव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, लोणचारम सरपंच विवेक पाटील, लोण खु.चे सुशील पाटील, झाडी सरपंच भूपेंन्द पाटील, भरवस सरपंच अशोक पाटील यांच्यासह नितीन महारू पाटील, राजेंद्र तुकाराम पाटील, दिलीप साहेबराव पाटील, प्रकाश शांताराम पाटील, संजय माधवराव पाटील, देवीदास हिरामण पाटील, अशोक बाबुराव पाटील, बाळू हैंबत पाटील, मंगेश साहेबराव पाटील, नंदू ठाकरे, भिला ओंकार पाटील, प्रकाश रामदास पाटील, श्रीकांत सीताराम पाटील, रोहित दिनेश पाटील, हेमंत अशोक पाटील, गोपाल प्रकाश पाटील, नाना उखर्डू पाटील, प्रकाश मन्साराम पाटील, नारायण पुंडलिक पाटील, उखर्ड रूपला मिस्तरी, सोनू मधुकर पाटील तसेच एकलहरे येथील माजी सरपंच फत्तेलाल अर्जुन पाटील, माजी उपसरपंच सुनील पाटील, प्रफुल्ल सीताराम पाटील, सजन पाटील, कीर्तीकुमार पाटील, जगदीश पाटील, शुभम पाटील उपस्थित होते.

Web Title: The problem of trust tunnel will be solved and the condition of passengers will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.