विधी सेवेच्या माध्यमातून येणाऱ्या अडचणी दूर करता येऊ शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:17+5:302021-06-27T04:12:17+5:30

तालुका विधी सेवा समिती, विधिज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिरप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी पॅनलप्रमुख व ...

Problems that arise through legal services can be overcome | विधी सेवेच्या माध्यमातून येणाऱ्या अडचणी दूर करता येऊ शकतात

विधी सेवेच्या माध्यमातून येणाऱ्या अडचणी दूर करता येऊ शकतात

Next

तालुका विधी सेवा समिती, विधिज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिरप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी पॅनलप्रमुख व दिवाणी न्यायाधीश प्रकाश महाळणकर होते तर प्रमुख म्हणून वर्ग दोनचे न्यायाधीश एम.के पाटील हे होते. यावेळी सरपंच जितेंद्र पाटील, उपसरपंच बाळासाहेब पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. तुषार पाटील,जेष्ठ विधिज्ञ ए. आर. बागूल, दत्ता महाजन, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील उपस्थित होते.

जेष्ठ विधिज्ञ ए. आर. बागूल यांनी सातबारा उतारा व त्यामधील असलेल्या नोंदीचे महत्त्व सांगितले. सतीश पाटील यांनी दस्त नोंदणीबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रशांत ठाकरे यांनी महिलांचे अधिकार, हक्क व कायद्याविषयी माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर यांनी एफआयआर म्हणजे प्रथम खबर अहवाल असतो, यात आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत आपण एफआयआरमध्ये देऊ शकतो, असे सांगून महिला, बालिका अत्याचार कायदेविषयक माहिती दिली.

तहसीलचे व्ही.व्ही. गिरासे यांनीही विविध योजनांची माहिती दिली तर कृषी सहायक सुरेश लांडगे यांनी कृषी खात्याशी संबंधित योजनांची माहिती सांगितली. सूत्रसंचालन ॲड. वेदव्रत काटे यांनी तर आभार तुषार पाटील यांनी मानले.

Web Title: Problems that arise through legal services can be overcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.