प्रभात चौकात समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:15 AM2021-07-25T04:15:32+5:302021-07-25T04:15:32+5:30

प्रभात चौक प्रभात चौकातील अंडरपासच्या पायाची उंची सुरूवातीला जास्त घेण्यात आली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर सिव्हिल इंजिनियर संघटनेचे ...

Problems in Prabhat Chowk | प्रभात चौकात समस्या

प्रभात चौकात समस्या

Next

प्रभात चौक

प्रभात चौकातील अंडरपासच्या पायाची उंची सुरूवातीला जास्त घेण्यात आली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर सिव्हिल इंजिनियर संघटनेचे सदस्य आणि आर्किटेक्ट यांनी याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिली. त्यानंतर राजकीय पदाधिकाऱ्यांनीही चर्चा केली. अखेर हा पाया अर्धा मीटरने खाली घेण्यात आला. आता अनेकांच्या मते या अंडरपासच्या वर होणाऱ्या रस्त्याचा उतार हा थेट आकाशवाणी चौकात येत आहे. भविष्यात तेथे सर्कल असेल. उतारावरून वाहनांचा वेग देखील चांगलाच वाढतो. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे.

कोट - महामार्गाचा डीपीआर वेळोवेळी बदलण्यात आला. मुळ डीपीआरच्या एक तृतियांश डीपीआर मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे समस्या वाढल्या आहेत. तसेच नागरिकांनीही सर्वच ठिकाणी अंडरपासची मागणी करु नये. - तुषार तोतला.

कोट - प्रभात चौकातील उंचीचा विषय आता संपला आहे. तसेच आकाशवाणी चौकापर्यंत जेवढा उतार हवा असतो. तेवढा पुरेसा आहे. अग्रवाल चौकात अंडरपासची रुंदी कमी असल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यावर विचार करता येईल. - सी.एम. सिन्हा, प्रकल्प संचालक, न्हाई.

Web Title: Problems in Prabhat Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.