शिवसंपर्क अभियानांतर्गत नागरिकांनी मांडल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:55+5:302021-07-20T04:12:55+5:30

भुसावळ शहरातील दक्षिण भागात शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. वीज, पाणी, घंटागाडी, आरोग्य, वीज वितरण कंपनीशी संबंधित तक्रारी, ...

Problems raised by citizens under Shiv Sampark Abhiyan | शिवसंपर्क अभियानांतर्गत नागरिकांनी मांडल्या समस्या

शिवसंपर्क अभियानांतर्गत नागरिकांनी मांडल्या समस्या

Next

भुसावळ शहरातील दक्षिण भागात शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. वीज, पाणी, घंटागाडी, आरोग्य, वीज वितरण कंपनीशी संबंधित तक्रारी, परिसर स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, पथदीप, रेशनिंगचे धान्य आदींबाबतच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. संबंधित खात्याशी संपर्क साधून या सर्व समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा. धीरज पाटील, माजी नगरसेवक दीपक धांडे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, उर्दू विभागाचे इलियास शेख, उपशहर प्रमुख अन्सार शाह, पवन नाले, नबी पटेल, आसिफ मोटू, अकिल तडवी, इद्रिस बागवान, सिकंदर गवळी, मनोज पवार, शेख मेहमूद, कैलास लोखंडे, पवन मेहरा, हेमंत बऱ्हाटे, सूरज पाटील, दिव्यांग सेनेचे विनोद गायकवाड, शरद जैसवाल, गजानन निळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Problems raised by citizens under Shiv Sampark Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.