शाहू नगर भागात समस्याच समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:07 PM2019-07-25T13:07:43+5:302019-07-25T13:08:04+5:30
शाहुनगर परिसरामध्ये गटारींची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे, पाणी रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...
शाहुनगर परिसरामध्ये गटारींची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे, पाणी रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे आजार उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न रहिवासी म्हणून सर्वांनाच पडला आहे.
या परिसरात साडंपाण्याचा निचरा होण्यासाठी , प्रत्येक गल्ली-बोळीत गटारी बांधण्यात आल्या आहेत. मात्र, या गटारींची वेळवर साफसफाई होत नसल्यामुळे, गटारींमध्ये घाण साचून पाणी तुंबत आहे. परिणामी हे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. तसेच ज्या दिवशी पाणी पुरवठा होतो. त्या दिवशी तर दिवसभर गटारीतींल पाणी रस्त्यावरुन वाहत असते . तसेच कचरा गाडीदेखील दोन दिवसाआड येत असल्यामुळे, अधिकच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या संदर्भात मनपाच्या आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार देखील केली आहे. मात्र, कुठल्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे, रहिवाशांना त्यांच्या घरासमोरील गटार स्वत:च साफ करावी लागत आहे. तसेच येथील रहिवासी हाजी सत्तार, चिराक उद्धीन शेख, शकिल शेख, सुकराबी बेलदार व इतर रहिवाशांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रारही केली होती. मात्र, तक्रार करुनही ही समस्या सुटलेली नाही. आठवड्यातून एखाद्या वेळेस सफाई कर्मचारी आले तर ते परिसरातील सर्व गटारींची सफाई न करता, रस्त्यावरच्या गटारींची सफाई करुन निघून जातात. त्या गल्ली-बोळीतील गटारींची सफाई करण्यासाठी सांगितल्यावर, ते गटारींवर अतिक्रमण असल्याचे सांगून, साफसफाईसाठी टाळाटाळ करतात. मनपा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे.
- रईस बाबा बागवान, शाहूनगर