नोटीस देऊन गाळे जप्तीची कार्यवाही करा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:18 AM2021-05-18T04:18:03+5:302021-05-18T04:18:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या गाळयांबाबत निर्णय घेण्यासाठी पाच जणांची उपसमिती नेमण्यात यावी असे निर्देश ...

Proceed to confiscate the slate by giving notice .... | नोटीस देऊन गाळे जप्तीची कार्यवाही करा....

नोटीस देऊन गाळे जप्तीची कार्यवाही करा....

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या गाळयांबाबत निर्णय घेण्यासाठी पाच जणांची उपसमिती नेमण्यात यावी असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी दिले. दरम्यान, जे गाळेधारक अनेक वर्षांपासून थकबाकीदार आहेत. त्यांचे गाळे बंद आहेत त्यांना रितसर नोटीस देऊन त्यांचे गाळे जप्तीबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्याची सुचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, श्री. शिव छत्रपती पुरस्कार विजेते डॉ प्रदिप तळवेलकर, नगरसेवक नितिन बर्डे, श्याम कोगटा आदी उपस्थित होते

क्रीडा संकुलाची केली पाहणी

बैठकीच्या सुरुवातीस पालकमंत्र्यांनी जिल्हा क्रीडा संकुलास भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर बैठकीत जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या बांधकामाचा, तेथील साहित्य, खेळाडूच्या सोईसुविधांचा आढावा घेतला. यावेळी क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांचे मानधन, संकुलातील गाळ्यामधील भागीदारीचे नाव रेकॉर्डवरुन कमी करणे, गाळे हस्तांतरण मान्यता, संकुलातील दुरुस्ती व सुविधा, महापालिकेच्या थकीत पाणीपट्टी व मालमत्ता कर आदि विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

वाढीव निधीचा प्रस्ताव तयार करावा...

शासनाच्या नवीन निर्देशानुसार जिल्हा व तालुका क्रीडा संकुल उभारणीचा मसुदा नव्याने तयार करण्यात यावा. जिल्ह्यातील ११ तालुक्यांच्या अपूर्ण क्रीडा संकुल बांधकामासाठी वाढीव निधी मागणीचा प्रस्तावही तयार करण्यात याव्यात. जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळांच्या सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधांबरोबरच चांगले मार्गदर्शक (कोच) उपलब्ध करुन द्यावेत. तसेच खेळाच्या सुविधा वापराचे दर माफक असावे अशी सुचना पालकमंत्री यांनी केल्या. जळगाव जिल्हा कुस्तीसाठी प्रसिध्द आहेत. जिल्ह्यात महाराष्ट्र केसरीसारखे खेळाडू आहेत. जिल्ह्यात अजून चांगले कुस्तीगीर निर्माण होण्यासाठी कुस्तीसाठी कोच मिळण्यासाठी क्रीडा आयुक्तांकडे मागणीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Web Title: Proceed to confiscate the slate by giving notice ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.