वनदाव्यांच्या अपिलावरील प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:21 AM2020-12-30T04:21:56+5:302020-12-30T04:21:56+5:30
फोटो आहे ३० सीटीआर ५६ जळगाव : वैयक्तिक वनदावे व त्यांच्या अपिलावरील सुनावणी जिल्हा स्तरीय समितीकडे सुरू झाली असून ...
फोटो आहे ३० सीटीआर ५६
जळगाव : वैयक्तिक वनदावे व त्यांच्या अपिलावरील सुनावणी जिल्हा स्तरीय समितीकडे सुरू झाली असून चार दिवससही सुनावणी होणार आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने अपीलासाठी बोलविले जात आहे. यात मंगळवारी पहिल्याच दिवशी जिल्हाभरातून ५००हून अधिक आदिवासी बांधव अल्पबचत भवन परिसरात आले होते.
उपविभागीय स्तरीय समितीने वैयक्तिक वनहक्क दावे फेटाळण्यानंतर त्याविरोधात आदिवासी बांधवांनी जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे अपील अर्ज केले होते. त्या संदर्भातील पुरावे सादर करण्यासाठी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना हजर राहण्याविषयी कळविण्यात होते. यामध्ये दोन हजार २५४ एकूण वनदावे असून २९ ते ३१ डिसेंबर व २ जानेवारी २०२१ रोजी आदिवासी बांधवांचे म्हणणे ऐकूण घेतले जाणार आहे. यासाठी चारही दिवस टप्प्याटप्प्याने आदिवासी बांधवांना बोलविण्यात आले असून मंगळवारी रावेर, यावल, चोपडा, जामनेर तालुक्यातील ५०० जण आले होते.
सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्याविषयी सूचना दिल्या जातात. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच असलेल्या अल्पबचत भवन येथे वनदाव्याच्या प्र क्रियेदरम्यान सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला होता. यासाठी एक मीटर अंतरावर खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आलेल्या जिल्हाभरातील व्यक्तींनी एकच गर्दी केल्याचे सांगण्यात आले.