भोगवटा २च्या मिळकती १मध्ये वर्ग करणारी प्रक्रिया वर्षभर चालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:37+5:302021-07-07T04:19:37+5:30
शासनाचा धोरणात्मक निर्णय घेतला की, भोगवटा वर्ग २ चा वर्ग १मध्ये समावेश करणे आणि सत्ता ब चा प्रकारच्या मिळकतीबाबतचा ...
शासनाचा धोरणात्मक निर्णय घेतला की, भोगवटा वर्ग २ चा वर्ग १मध्ये समावेश करणे आणि सत्ता ब चा प्रकारच्या मिळकतीबाबतचा तीन दिवसांचा कॅम्प पाचोरा उपविभागीय कार्यालयात लावण्यात आला होता. मात्र, यामुळे मिळकतधारकांची कागदपत्रांची जमवाजमव करण्यात दमछाक होत होती. त्यामुळे याची मुदत वाढवून देण्याची मागणी काॅंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पाचोरा प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली. त्यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया वर्षभर चालू राहील, असे आश्वासन दिले.
यावेळी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. अमजद पठाण, जिल्हा अल्पसंख्यक सचिव इरफान मनियार, महिला जिल्हा सचिव कुसुम पाटील, उपाध्यक्षा संगिता नेवे, तालुकाअध्यक्षा ॲड. कविता पवार, कल्पना निंबाळकर, रेखा पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, शरीफ शेख, समाधान पाथरवट, रणजित पाटील, संजय सोनार, किशोर पाटील आदी उपस्थित होते.
ज्यांना अडचण आल्यास स्थानिक पातळीवरील शहरी व ग्रामीण भागातील काॅंग्रेस पदाधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केले आहे.