दिव्यांग प्रमाणपत्रांची आजपासून कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:13 AM2020-12-23T04:13:45+5:302020-12-23T04:13:45+5:30

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड सुविधा पूर्ववत झाल्यानंतर आता बुधवार, २३ डिसेंबरपासून दिव्यांग मंडळ ...

Processing of disability certificates from today | दिव्यांग प्रमाणपत्रांची आजपासून कार्यवाही

दिव्यांग प्रमाणपत्रांची आजपासून कार्यवाही

Next

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड सुविधा पूर्ववत झाल्यानंतर आता बुधवार, २३ डिसेंबरपासून दिव्यांग मंडळ कार्यान्वित होत असून, प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप-अधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे समन्वयक डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांनी याबाबत मंगळवारी पाहणी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून ही सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन सुरू होते, नुकतीच मंडळाची बैठक झाली होती. ८ ते ११ नाव नोंदणी होणार असून, वैद्यकीय तपासणी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत केली जाणार आहे. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात होईल. २१ प्रकारांमध्ये विविध तज्ज्ञ तपासणी करून त्यानुसार प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रमाणपत्रासाठी आधी (www.swavlambancard.in) या संकेतस्थळावर जावून (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर अर्ज भरणे आवश्यक आहे. या अर्जाची प्रिंट काढून अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर बुधवारी लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे. येथील प्रक्रिया झाल्यावर प्रमाणपत्र घरपोच तसेच पुढील आठ दिवसात (www.swavlambancard.in) या संकेतस्थळावरून प्रिंट काढून लाभार्थ्याला मिळू शकणार आहे. दिव्यांग मंडळाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Processing of disability certificates from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.