लेफ्टनंटपदी निवड झालेल्या प्रथमेशची मेहरगावात मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:12 AM2021-06-29T04:12:37+5:302021-06-29T04:12:37+5:30
प्रथमेश पाटील याने तालुक्यातील मेहरगाव या आठशे लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. यानंतर त्याने ...
प्रथमेश पाटील याने तालुक्यातील मेहरगाव या आठशे लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. यानंतर त्याने माध्यमिक शिक्षण साने गुरुजी विद्यालयात घेतले. खडकवासला येथे एनडीएचे प्रशिक्षण घेतल्यानंतर सरळसेवा भरतीत सर्वाेच्च पद मिळवून यश संपादन केले आहे. तो बाविसाव्या वर्षी डेहराडून येथील एका वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून आता लेफ्टनंट म्हणून भरती झाला आहे. या बातमीने ग्रामस्थांनी आणि तरुणांनी जल्लोष साजरा केला.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र यादव, गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार डॉ. शरद पाटील, माजी सैनिक न्यानेश्वर पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. प्रथमेश पाटील हा जानवे येथील ज्युनियर कॉलेजचे प्रा. प्रवीण पाटील यांचा चिरंजीव आहे. गावातील सरपंच राकेश ठाकरे, अमोल पाटील, उपसरपंच पराग ठाकरे, माध्यमिक शिक्षक हितेश बेहेरे, पोलीस शशिकांत पाटील, उत्पादन शुल्क विभाग घनश्याम पाटील, कुंदन निकम, प्रशांत शिंदे उपस्थित होते.
===Photopath===
280621\28jal_14_28062021_12.jpg
===Caption===
लेफ्टनंटपदी निवड झालेल्या प्रथमेशची मेहरगावात मिरवणूक