चाळीसगावला महाराणा प्रतापांच्या प्रतिमेची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 09:39 PM2019-06-15T21:39:01+5:302019-06-15T21:39:59+5:30
महाराणा प्रताप यांच्या ४७९व्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे मोठ्या उत्साहात शनिवारी सायंकाळी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
चाळीसगाव, जि.जळगाव : महाराणा प्रताप यांच्या ४७९व्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे मोठ्या उत्साहात शनिवारी सायंकाळी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती. अग्रभागी ढोल-लेझीमचा गजर, विद्युत रोषणाई, अश्व नृत्य अशा जल्लोषात शहराच्या विविध भागातून मिरवणूक पुढे गेली. ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
सायंकाळी सहा वाजता रेल्वे स्थानकाजवळ अगोदर प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, प्रा.साहेबराव घोडे, कैलास सूर्यवंशी, नारायणदास अग्रवाल, प्रदीप देशमुख, वसंत चंद्रात्रे, प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, युवा उद्योजक मंगेश चव्हाण, शिवाजी राजपूत, गटनेते संजय रतनसिंग राजपुत, उमंग महिला परिवाराच्या प्रमुख, संपदा उन्मेष पाटील, प्रमोद पाटील, राजेंद्र चौधरी, भगवान पाटील, डॉ. सुनील राजपुत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, आनंदसिंग राजपूत, संध्या राजपूत, मंगेश राजपूत, भय्यासाहेब पाटील, ठाणसिंग राजपूत, नगरसेवक रामचंद्र जाधव, दीपक पाटील, चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपूत, श्याम देशमुख, अरुण अहिरे, विजया प्रकाश पवार, सविता जाधव, चिराग शेख, सूर्यकांत ठाकूर, रवींद्र चौधरी, पं.स.उपसभापती संजय पाटील, किशोर पाटील ढोमणेकर, दिनेश पाटील, अॅड.प्रदीप अहिरराव, मिलिंद देशमुख, दिलीप घोरपडे, गणेश पवार, मीनाक्षी निकम, नीलेश राजपुत, पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड, विश्वास चव्हाण, स्मिता बच्छाव, योगेश पाटील, भारती चौधरी, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, सुभाष ठोके, ईश्वरसिंग ठाकरे, सोनल साळुंखे, सुचित्रा राजपूत, सुवर्णा राजपूत, आर.डी.चौधरी, एम.बी.पाटील, सुनील राजपुत आदी उपस्थित होते.
महाराणा प्रताप हे शौर्याचे प्रतीक असून, त्यांच्या प्रेरणा भावी पिढीसाठी दिशादर्शक आहे. युवा पिढीने त्यांचा त्याग, बलिदान आणि स्वाभिमान यांचे स्मरण नेहमी करावे, असे उदबोधन डॉ. सुनील राजपूत यांनी केले. आनंदसिंग ठोके यांनीही मनोगत व्यक्त केले.
जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी जयदीप गांगुर्डे, प्रवीण राजपूत, नीलेश राजपूत, अमोल राजपूत, प्रशांत राजपूत, टोनू राजपूत, अभयसिंह राजपूत, पप्पू राजपूत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.