कोठली येथे सैनिकाची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 18:29 IST2020-11-09T18:26:46+5:302020-11-09T18:29:26+5:30

माजी सैनिक समाधान पाटील यांचा सत्कार गावातून जंगी मिरवणूक

A procession of soldiers at Kothali | कोठली येथे सैनिकाची मिरवणूक

कोठली येथे सैनिकाची मिरवणूक


भडगाव : महाराष्ट्र रक्षक सेनेचे भडगाव तालुकाध्यक्ष समाधान पाटील यांची ५ सप्टेंबर २०२० रोजी भारतीय सेनेमधून सेवानिवृत्ती झाली. त्यांचा सत्कार समारंभ व मिरवणूक कोठली तालुका भडगाव येथे पार पडली. याप्रसंगी आमदार किशोर पाटील, अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, महाराष्ट्र रक्षक सेनेचे संस्थापक प्रवीण राजपूत उपसंस्थापक सुवर्णसिंग राजपूत, कार्याध्यक्ष रतन परदेशी, जिल्हाध्यक्ष सुभेदार जयसिंग राजपूत, माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष आबा गरुड, अँटी करप्शन ब्युरोचे उपाध्यक्ष गोकूळ पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सविता माळी, खान्देश विभागप्रमुख शीलांबरी जमदाळे, जामने तालुकाध्यक्ष काशीनाथ शिंदे, रेखा देशमुख, लक्ष्मी बैरागी, कविता माळी, विनोद चुंगडे, जी. एम. तळे, डॉ. अनिल देशमुख, राजेंद्र पाटील, सुनील राजपूत, संभाजी पाटील, हर्षल महाजन, अनिल महाजन, राजू चौहान, आबा महाजन, रणसिंग राजपूत, शरद परदेशी यांनी भावी वाटचालीसाठी समाधान पाटील यांना शुभेच्छा दिल्या. आर.डी. पाटील यांनी आभार मानले.

Web Title: A procession of soldiers at Kothali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Bhadgaon भडगाव