17 वर्ष मातृभूमीची सेवा करीत निवृत्त झालेल्या जवानांची ग्रामस्थांनी काढली मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 12:34 PM2017-04-06T12:34:52+5:302017-04-06T12:34:52+5:30
17 वर्षे मातृभूमीची सेवा करीत सैन्यदलातून निवृत्त झालेल्या दोघ जवान आपल्या मूळगावी विचखेडा येथे आले असता, ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत करून, घोडय़ावरून मिरवणूक काढली.
Next
पारोळा,दि.6- 17 वर्षे मातृभूमीची सेवा करीत सैन्यदलातून निवृत्त झालेल्या दोघ जवान आपल्या मूळगावी विचखेडा येथे आले असता, ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत करून, घोडय़ावरून मिरवणूक काढली. ग्रामस्थांच्या या प्रेमामुळे दोन्ही जवानही भारावले होते.
विचखेडे येथील भावराव निळकंठ पाटील व आनंद भावराव चव्हाण हे दोघे वर्गमित्र एकाच दिवशी सैन्य दलात भरती झाले. 17 वर्षे या दोघांनी मराठा बटालियनच्या माध्यमातून देशाची सेवा केली. आपली सैन्य दलातील सेवा प्रामाणिकपणे बजावून ते नुकतेच निवृत्त होऊन विचखेडे या मुळ गावी आले. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी साईनाथ मित्र मंडळ आणि ग्रामस्थांनी त्यांचे गावाच्या वेशीजवळ जंगी स्वागत केले. दोघांची घोडय़ावरुन गावातून मिरवणूक काढण्यात आली. माजी सरपंच सुधाकर पाटील, भिकन माळी, निळकंठ पाटील, ताराचंद महाजन, दीपक निकम यांनी या दोन्ही जवानांचे स्वागत केले.
दरम्यान, ग्रामस्थांच्या या प्रेमामुळे दोघ जवान भारावले होते. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. त्यांनीही सैन्यदलातील चित्तथरारक अनुभव कथन केला. यावेळी डॉ.ज्ञानेश्वर पाटील, अमोल पाटील, उदय निकम, नीलेश पाटील, रणजित पाटील, दगडू माळी, रोहिदास पाटील, संभाजी पाटील, शंकर चौधरी, गणपत गायकवाड, विशाल पाटील, संदीप पाटील, उपस्थित होते.(वार्ताहर)