२१ कारखान्यांमधील उत्पादन केले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:16 AM2021-04-24T04:16:43+5:302021-04-24T04:16:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अत्यावश्यक सेवेत नसलेल्या पण सुरू असलेल्या २१ कारखान्यांमध्ये कडक निर्बंध झुगारून उत्पादन सुरू होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अत्यावश्यक सेवेत नसलेल्या पण सुरू असलेल्या २१ कारखान्यांमध्ये कडक निर्बंध झुगारून उत्पादन सुरू होते. हे कारखाने तातडीने बंद करण्याच्या सुचना जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आर.आर. डोंगरे यांनी दिल्या आहेत. डोंगरे यांच्यासोबत या पथकात एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी ए.एम.पारधी , अभियंता मिलींद पाटील, प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर यांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी राऊत यांनी कडक निर्बंधांचे आदेश देतांना उद्योग बंद राहतील याची जबाबदारी जिल्हा उद्योग केंद्र आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर दिली होती. त्यानुसार या अधिकाऱ्यांच्या पथकाने गेल्या दोन दिवसांत विविध आस्थापनांची तपासणी केली. त्यात औद्योगिक वसाहत आणि त्या बाहेरील आस्थापनांचा समावेश आहे. त्यात २१ ठिकाणी उत्पादन तातडीने बंद करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.