यावर्षी कापसाचे उत्पादन जेमतेमच

By ram.jadhav | Published: November 8, 2017 07:53 PM2017-11-08T19:53:49+5:302017-11-08T19:55:24+5:30

आता दिवाळीनंतर काहीसा उजळून निघत आहे. ३५०० वर बंद होत असलेला खरेदीचा दर आता ३८०० ते ४४०० पर्यंत आले आहेत.

Production of cotton this year decline | यावर्षी कापसाचे उत्पादन जेमतेमच

यावर्षी कापसाचे उत्पादन जेमतेमच

Next
ठळक मुद्देकोरडवाहू क्षेत्रात एकरी २ क्विंटलचीच शक्यताएकाच वेचणीत झाडे खुर्राटबागायत कापसाच्याही वेचण्या आटोक्यातआँनलाइन, आँफलाइन खरेदीचे सोयरंसुतक नाहीच

संजय हिरे
आॅनलाईन लोकमत, दि़ ८, खेडगाव, ता.चाळीसगाव : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने नुकसान केलेल्या कापसाला कमी भाव देऊन व्यापाºयांकडून शेतकºयांची अडवणूक केली जात होती़ मात्र हा कापूस आता दिवाळीनंतर काहीसा उजळून निघत आहे. ३५०० वर बंद होत असलेला खरेदीचा दर आता ३८०० ते ४४०० पर्यंत आले आहेत. याशिवाय दिवाळी आटोपल्याने शेतकºयांनाही कापूस विकण्याची आता घाई नाही़ यामुळेही आता दरात सुधारणा होत आहे. संपूर्ण कापसाची वेचणी आटोपूनच कापूस विक्रीला काढण्याच्या मन:स्थितीत आता शेतकरीवर्ग आला आहे. शिवाय यावर्षी उत्पादनही जेमतेमच असल्याने आपल्या कष्टाच्या उत्पादनाला असा अल्प भाव मिळत असल्याने यातून एकप्रकारे शेतकºयांनी अघोषित विक्री बंद पुकारल्याची स्थिती निर्माण होत आहे़
यावर्षी कपाशीची आहे ती बोंडे एकाचवेळी फुटलीत. त्यामुळे एकाच वेचणीत झाड ‘खुर्राट’ होत आहे. साधारणत: यामागील हंगामात चार-पाच वेचण्या एका क्षेत्रात होत होत्या़ आता तशी स्थिती नाही. एका एकरात पहिल्या वेचणीत पाच क्विंटल कापूस निघाला असेल, तर दुसरी वेचणी जेमतेम निघत आहे़ अशी परिस्थिती प्रथमच पाहावयास मिळत असल्याची भावना शेतकरी मांडत आहेत़ हलक्या, मुरमाड जमिनीवर एक ते दोन क्विंटल उत्पादन निघणेही यावर्षी कठीण आहे़ एकरी १० क्विंटल उत्पन्न काढणारा भाग्यवान ठरणार आहे. तर सरासरी एकरी पाच क्विंटलचा उतारा बसल्याचे चित्र आहे.
यंदा कापसात कवडीचे प्रमाण जास्त आहे. पावसाआधी, पावसातला आणि पावसानंतरचा अशी तीन टप्प्यात कापसाची प्रत झाली आहे. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचा एकसारखा कापूस दुर्मीळच आहे़ तसेच पावसातल्या कापसाची आर्द्रतेने चमक कमी झाली आहे़ तर आताच्या कापसात कचºयाचे प्रमाण वाढत आहे़
शासकीय कापूस खरेदी केंद्र अजून ‘सुरू’च होत आहेत. आतापर्यंत फेडरेशनला एक कवडीदेखील कापूस न देणारे अनेक शेतकरी आहेत. खासगी कापूस विक्रीत अधिक भाव मिळत असल्याने व शासकीय कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडर, हमाल यांच्याकडून होणारी अडवणूक, पैसे मिळण्यास होणारा विलंब यामुळे पूर्वीची टोकन काढून (आॅफलाइन) होणारी शासकीय खरेदी असो, की सध्य:स्थितीतील आॅनलाइन कापूस खरेदी शेतकºयांच्या ध्यानीमनी न आॅफलाइन, न आॅनलाइन आहे. फक्त एक सुरक्षा किंवा हमी या भावनेनेच शेतकरी फेडरेशन किंवा शासकीय खरेदी याकडे पाहतो. खासगी कापूस खरेदी ३८०० ते ४५०० रु.दराने सुरू झाली आहे. व शासकीय खरेदी भाव, ए' वन ग्रेडच्या कापसाला ४२५० व इतर मालास त्याहून कमी दर मिळणार आहे. घरबसल्या अधिक भाव, शिवाय प्रतवारीची, वाहतुकीची, आॅनलाइन नोंदणीची झंझट नको, या कारणास्तव शेतकºयांना शासनाने सुरू केलेल्या आॅनलाइन खरेदीची कोणतीच भुरळ आज तरी नाही.
‘कवडी’ कापूस कवडीमोलच : परतीच्या पावसामुळे कपाशीच्या उमलणाºया बोंडाचे नुकसान झाले़ कवडी (लेंडी) व ओला कापूस सुकवण्याऐवजी विक्रीकडे शेतकºयांचा कल होता, शिवाय दिवाळीच्या सणासाठी पैशांचीही नड असल्याने बाजारात कापसाची विक्री होत होती़ हे हेरून व्यापाºयांनी २२०० ते २५०० हजारांइतका कवडीमोल भाव दिला. यावर्षी उत्पादन कमी असूनही कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकºयांमध्ये नाराजी आहे़ ज्या शेतकºयांना अडचण होती, त्यांनी गरजेच्या काळात न परवडणाºया दरातही विक्री केली़ मात्र गेल्या काही दिवसांपासून शेतकºयांनी कापसाची विक्री बंद केल्याने आता स्थिती सुधारली आहे.
कर्जमाफीची प्रतीक्षाच़़़
गेल्या सहा महिन्यांपासून वाट पाहत असलेल्या शेतकºयांनी खरिपाच्या पिकांवर खर्च केला. उत्पादनही घेतले, मात्र कर्जमाफी अजूनही मिळत नसल्याने शेतकºयांना नड म्हणून अल्प दरात आपले उत्पादन विकावे लागले़ कर्जमाफीची रक्कम उपलब्ध झाली असती तर शेतकºयांनी आपला माल कमी भावात विकला नसता़
शासकीय कापूस खरेदीत ग्रेडरची, हमालांची मनमानी, त्यासाठी द्यावी लागणारी चिरीमिरी, प्रतवारीसाठीची अडवणूक, कमी भाव या सगळ्यांना कंटाळून मागील पाच-सहा वर्षांपासून फेडरेशनचा नाद सोडला आहे़ शिवाय बोनस देणेही सरकार विसरलंय. आणि दाराशीच खासगी व्यापाºयांकडून जास्तीचा दर मिळत असल्याने कोण जाणार आहे, फेडरेशनला़
- मन्साराम महाजन, खेडगाव (शेतकरी)




 

Web Title: Production of cotton this year decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.