उमवि व्यवस्थापन पषिदेवर प्रा.नितीन बारी व प्रा.एल.पी.देशमुख विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 05:04 PM2018-02-20T17:04:52+5:302018-02-20T17:10:58+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरही विद्यापीठ विकास मंचचाच प्रभाव
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. २० - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर अधिसभेतून प्राचार्य गटात डॉ.एल.पी.देशमुख यांनी डॉ.आर.एस.पाटील यांचा ३० मतांनी तर प्राध्यापक गटात प्रा.नितीन बारी यांनी प्रा.संजय सोनवणे यांचा २१ मतांनी पराभव केला. विद्यापीठ विकास मंचचे पाच, एन.मुक्टो व प्राचार्य फोरमचे एक सदस्य निवडून आल्याने व्यवस्थापन परिषदेवरही विद्यापीठ विकास मंचनेच बाजी मारली.
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी अधिसभेची पहिली बैठक झाली. या बैठकीत प्राचार्यांमधून व्यवस्थापन परिषदेवर खुल्या प्रवगार्तून निवडून देण्याच्या एका जागेसाठी आणि प्राध्यापकांमधून खुल्या प्रवर्गात निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी निवडणूक झाली. प्राचार्यांंमधून नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख आणि शहादा येथील पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे महाविद्याचे प्राचार्य आर.एस.पाटील हे दोन उमेदवार उभे होते. तर प्राध्यापक गटात प्रा.नितीन बारी व प्रा.संजय सोनवणे हे उमेदवार होते.